वार्ताहर
परळी
गणपती, वक्रतुंड, एकदंत अशा अनेक नावांनी आपल्या भक्तांमध्ये प्रचलित असलेले आपले लाडके बाप्पा त्यांच्या आगमनाने नवचैतन्य निर्माण होते. आपल्या बाप्पासाठी काही करण्यासाठी तयार असलेली ही तरुणाई, दरवर्षीप्रमाणे जरी बाप्पाचे आगमन आणि विसर्जन मोठ्या उत्साहात होणारे नसले तरी गणेश भक्तांमध्ये तिळमात्रही याचा फरक पडलेला नाही. ना गूलाल, ना डीजे ना बेफाम होणारी तरुणाई तरी देखील आपल्या गणपती बाप्पा आणखी उठावदार दिसण्यासाठी तरुणाई गुंतलेली दिसतेय.
बाप्पांचे आगमन होणार मग त्यासाठी सजावट करायची नाना विविध प्रकारच्या सजावटीचे प्रकार आहेत. परंतु कातवडी येथील गणेशभक्त सूरज लोटेकर यांनी आपल्या गावाची प्रतिकृती तयार करत गावावरचा निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. उरमोडीचे विहंगम दृश्य तसेच पवनचक्क्या आणि गावातील रस्ते, दवाखाने,मंदिरे यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या आहेत. हे सजावट करण्यासाठी तब्बल 15 ते 20 दिवसांची अथक परिश्रम लागले असून या बहारदार सजावटीला पाहण्यासाठी गणेश भक्तांनी रेलचेल सुरू आहे.