प्रेमी युगुलांचा निर्मनुष्य ठिकाणी वावर वाढला ; पालकांनीही दक्ष राहणे गरजेचे

 

 

अल्पेश लोटेकर

परळी

शहर उपनगर अस ग्रामीण भागातील निर्जन ठिकाणी प्रेमी युगुलांच्या वर्दळीने गजबजू लागले आहेत चिटपाखरूही न फिरणाऱ्या अन चोर लुटमारी पासून कोणत्याही क्षणी जीवघेणे संकट ओढवू शकते अशाच धोकादायक निर्मनुष्य स्थळी इश्काचा सिलसिला राजरोस सुरू आहे पालकांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे

लोग डाऊन शिथील झाल्याने प्रेमीयुगल यांच्या झुंडीच्या झुंडी शहर उपनगरातील निर्जन स्थळी आश्रयाला येऊ लागले आहेत शाळा कॉलेजला जाण्याच्या बहाण्याने दप्तराची सॅक पाठीला टांगून भरधाव दुचाकी वरून निर्जन स्थळी गाठण्याची जणू त्यांच्यामध्ये स्पर्धाच लागली असावी की काय असे चित्र दिसून येते

 

स्कार्फ आणि मास्क असाही वापर

 

स्कार्फ आणि मास्क मुळे चेहरा ओळखण्याचा प्रश्न येत नाही त्याचा फायदा घेत अलीकडच्या काळात प्रेमी युगुलांनी साऱ्या मर्यादा ओलांडण्याचा चे चित्र आहे पोलिसांच्या डोळ्यांदेखत त्यांचा सिलसिला सुरू असतो निर्जन स्थळी चालणारा इश्काचा बाजार कोणत्याही क्षणी जीवघेणा ठरू शकतो.