अल्पेश लोटेकर / परळी
धकाधकीच्या अन् वेगवान धावत्या आयुष्यातून वेळ काढून महिला सक्षमिकरणाचा वसा घेतलेले भोंदवडे येथील पेशाने शिक्षक असलेले दयानंद पवार हे 1985 पासून म्हणजे जवळपास 35 वर्षांपासून परळी खोऱयातील मुली महिला सक्षम व्हाव्यात तसेच येणाऱया सर्व परिस्थीतीशी निर्भिडपणे सामोरे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहे.
परळी खोरे भाग हा दऱया खोऱयांचा धबधबे अन् धरणांचा यामुळे कोणती परिस्थीती कधी उदभवेल सांगता न येणारी असल्याने 35 वर्षांपासून शाळेतील मुलींना मोफत पोहण्याचे क्लासेस अविरतपणे सुरु आहेत. तसेच स्वयंरोजगार निर्मिती करीता मोफत टेलरिंग क्लासेस घेण्यात येत आहेत. तसेच सध्या महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत संभ्रमावस्ता असल्याने त्यांनाच सक्षम करण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधत कोरोना काळातील नियमांचे पालन करित अल्प दरात जुडो-कराटे क्लासेस सुरु करण्यात येणार आहेत.
परळी भागातील मागासवर्गीय महिला मुलींना शहरी मुलांप्रमाणे खडाखड इंग्लिश बोलता यावे याकरिता इंग्लिश ऍकॅडमी मार्फत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्रज्ञा एज्युकेशन सोसायटी तर्फे भविष्यकाळात महिला मुलींच्या सर्वांगीन विकासाठी स्पर्धा, मनोरंज कार्यक्रम तसेच एमपीएसी, युपीएसी अभ्यासक्रम तसेच मुलींना ट्रेकिंग करत भागातील दऱयाखोऱयातील अलिप्त होणाऱया घटकांची माहिती करुन देणार असल्याचे दयानंद पवार यांनी सांगितले.
मुलींना दिले जाते मोफत मल्लखांब प्रशिक्षण
ग्रामीण भागातील मुला-मुलींनी शेतात खितपत पडणाऱया आई वडीलांचे स्वप्न पुर्ण व्हावे या करिता परळी खोऱयातील मुला-मुलींना मल्लखांब प्रशिक्षण देवून तालुका स्तरिय, जिल्हा स्तरिय, तसेच मोठय़ा स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवला आहे.