(अजित जगताप)
सातारा दि: सातारा जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंच्या बौद्धिक कौशल्य वाढीसाठी सातारा येथील विश्वगंगा प्रतिष्ठानच्या वतीने सातारा शहरातील राष्ट्रीय काँग्रेस भवन सातारा या ठिकाणी ५० वी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .
या स्पर्धेमध्ये १२० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना विश्वगंगा चषक व पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. गेली दोन वर्ष कोरोना काळामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. त्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेस भवन येथे झालेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून मनोज कुमार तपासे, जयंत उथळे व शार्दुल तपासे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .विशेष बाब म्हणजे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार विशाल कदम यांनी सुद्धा बाल बुद्धिबळ स्पर्धेत स्पर्धकासोबत बुद्धिबळाचा डाव सादर केला. त्याचे अनेक पालकांनी कौतुक केले.
फोटो -सातारा येथील राष्ट्रीय काँग्रेस भवन मध्ये झालेली बुद्धिबळ स्पर्धा (छाया- अजित जगताप, सातारा)