परळी खोऱयातील कोरोना टेस्टींगला आली गती

 

वार्ताहर/ परळी

कोरोना महामारीची दुसरी लाट सातारा जिल्हय़ाला धडका मारत असून सलग दुसऱया दिवशी कोरोना बाधीतांचा आकडा हा 300 पार गेला आहे. हा कोरोना ग्रामीण भागात पुन्हा हातपाय पसरु नये यासाठी परळी प्राथमिक आरोग्य केंद्र शर्तीचे प्रयत्न करत आहेत.
परळी खोरे गेल्या काही महिन्यांपुर्वी कोरोना हॉटस्पॉट झाले होते. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता स्थिती अटोक्यात आणने अशक्य होते मात्र वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन यादव यांच्या मागर्दशनाखाली त्यांच्या टिमने कोरोना हद्दपार केला आहे. याच पार्श्वभुमीवर कोरोनाची दुसरी लाट खोऱयात हैदोस घालू नये साठी शक्य तितकी काळजी ही घेतली जात आहे. नित्रळ, कातवडी तसेच अन्य गावांमध्ये जावून आरटीपिसीआर टेस्ट घेवून योग्य ती काळजी घेण्याचे अवाहन केले जात आहे. आरोग्य सेवक महेश भोसले प्रयोगशाळा तंत्रज्ञ विशाल जाधव आरोग्य सेविका आशा शिंदे त्यांचे सहकाऱयांनी प्रत्येक गावात जनजागृती करत टेस्टींगला सुरुवात केल्याचे डॉ. सचिन यादव यांनी सांगितले.