वार्ताहर
परळी
कोरोनाचा जिल्ह्यात पहिला रुग्ण हा 23 मार्च 2020 रोजी खेड गावात आढळला. त्यानंतर कोरोना ची दहशत ही जिल्हावासीयांमध्ये पाहायला मिळाले परंतु कोरोना चा प्रसार हा गेल्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये थोडक्यात असल्याने सर्वांनी निश्वास सोडला होता परंतु पुन्हा एकदा कोरूना साकळी संपूर्ण जिल्ह्यात वाढत असून परळी खोऱ्यात ही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत तरी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून आपण कोरोनाला पुन्हा आटोक्यात आणू या असे आवाहन कातवडी चे सरपंच हनुमंत देवरे यांनी केले
कातवडी येथे गेल्या दोन दिवसात तीन रुग्ण आढळल्याने गावातील वातावरण हे चिंताजनक झाली आहे याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी महेश भोसले, आशा शिंदे व रेखा वांगडे यांच्या टीमने कातवडीची RT-PCR टेस्ट घेण्यात आली तर नंतर ग्रामस्थांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेतली तर कोरोना नक्कीच हद्दपार करूया तसेच शासन नियमांचे पालन करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचारी महेश भोसले यांनी दिल्या.