Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedउपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या माध्यमातून होणार 100 गावांमध्ये निर्जंतुकीकरण मा. नितिन...

उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या माध्यमातून होणार 100 गावांमध्ये निर्जंतुकीकरण मा. नितिन बानुगडे-पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

 

 

 

वार्ताहर

परळी

कोरोनाची दाहकता राज्यात मंदावली असली तरी सातारा जिल्हा हा कोरोनाच्या विळख्यात पुर्णत: अडकलेला दिसत आहे. मुंबई-पुण्याच्या तुलनेत रुग्णसंख्या असल्याने जिल्ह्य़ातील वातावरण चिंताजनक झाले आहे. मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या झालेल्या ऑनलाईन मीटिंग मधील आव्हानांना नुसार सोमवार 24 मे रोजी सातारा विधानसभेच्या माध्यमातून सातारा विधानसभेत 100 गावांमध्ये मोफत औषध फवारणी व निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात आली.

मौजे कारी (ता. सातारा) येथे ना. नितीन बानुगडे-पाटील व सातारा-सांगली संपर्क प्रमुख व शिवसेना उपनेते यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. मोहिमेची सर्व माहिती घेऊन सर्व कार्यकर्त्यांच्या या कामासाठी अभिनंदन केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक उपजिल्हाप्रमुख शिवसेना सातारा सचिन मोहिते, तालुकाप्रमुख अनिल गुजर, उपतालुकाप्रमुख तानाजी चव्हाण, प्रशांत शेळके, कारी सरपंच बेडेकर, उपसरपंच सुरेश मोरे, सामजिक कार्यकर्ते गुलाबराव चव्हाण, मारुती माने, विभाग प्रमुख विशाल जाधव, लक्ष्मण जाधव, दीपक माने, उपविभागप्रमुख राम घोरपडे, शाम लोटेकार, अजय सावंत, हेमंत साळुंखे, राहुल मोहिते, उपसरपंच सागर रायते, निखिल पिंपळे, चेतन कुलकर्णी, रोहित निकम, अजिंक्य शिंदे, माने,विनायक घाग(फौजी) आदी उपस्थित होते.

 

 

चौकट

भागात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शक्य ती मदत करु

जिल्हय़ातील रुग्णवाढ ही चिंताजनक असून वाढत्या बाधीत रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यापासून पहायला मिळत आहे. शिवसेना सातारा विधानसभा अंतर्गत शक्य ती मदत आम्ही भागासाठी करु. याच पार्श्वभूमीवर आम्ही करंडी येथे स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारले असून आता भागातील 100 गावांमध्ये सर्व सहकार्यांच्या मदतीने मोफत निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

सचिन मोहिते, उपजिल्हाप्रमुख शिवसेना सातारा विधानसभा

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular