Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedहाय व्होल्टेजमुळे काळोशीत टीव्ही फ्रिज जळाले ; परळी भागातील काळोशी येथे हाय...

हाय व्होल्टेजमुळे काळोशीत टीव्ही फ्रिज जळाले ; परळी भागातील काळोशी येथे हाय व्होल्टेज मुळे काही घरांमधील टीव्ही जळाले

 

वार्ताहर
परळी
तालुक्यातील परळी भागातील काळोशी येथे शनिवारी सायंकाळी अचानक हायव्होलटेज झाल्याने जवळपास पस्तीस टिव्ही जळाले. तर काही जणांची मिटर जळाले. तर काहींचे फ्रीज सुद्धा जाळले आहेत. सादर घटनेची माहिती काळोशीचे संतोष डफळ, संदीप निकम, सतीश निकम यांनी दिली मात्र महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला असून , संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. गेली दोन महिने झाले स्थानिक महावितरणकडे तक्रार करत आहेत की व्होलटेज कमी जास्त होत आहे तरीदेखील संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असून, कोरोनासारख्या महामारीत लोकांना मोठा फटका बसला आहे. महावितरणची चुक असल्याने येथील रहिवाश्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर महावितरणच्या मुख्य कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा मोहिते यांनी दिला.
गोरखनाथ निवृत्ती निकम यांच्या घरात टिव्हीला आग लागली, यावेळी त्यांच्या समवेत त्यांची पत्नी होती. अचानक आग लागल्याने त्यांना काय करावे सुचलेच नाही , त्यांनी शेजारी असलेल्या युवकाला बोलवलं यानंतर त्याने जळता टिव्ही उचलून बाहेर काढत पाणी टाकून विजवला. संबंधित युवक वेळेवर आला नसता तर या ठिकाणी विपरीत घटना घडली असती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular