वार्ताहर
परळी
वेनेखोल (ता. सातारा) येथील ओमकार सेवा भावी संस्था आयोजित वृक्षारोपण आणि कोविड योद्धा सन्मान सोहळा दिनांक 10 व 11 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे परळी विभाग आरोग्य सेवक महेश भोसले, कॅप्टन गजानन चव्हाण, सरपंच नारायण सकपाळ, पी. के. सकपाळ, रामचंद्र सकपाळ, संदिप सकपाळ, अलका जाईगडे, राजेंद्र सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
परळीचे आरोग्य सेवक महेश भोसले यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी कोरोनामुक्त गाव आणि घ्यावयाची काळजी, झाडे लावा झाडे जगवा, पृथ्वी वाचवा. वृक्षसंवर्धन बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रासाठी शाहू सकपाळ, बाळासाहेब सकपाळ, संदीप जाईगडे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संस्थेचे सचिव कल्पेश सकपाळ यांनी केले.