Thursday, June 19, 2025
HomeBreaking Newsपरळी-ठोसेघर पावसाचा हाहाकार ! परळी-ठोसेघर खोऱयातील गावे संपर्कहीन : ओढय़ांना आलं नदीच...

परळी-ठोसेघर पावसाचा हाहाकार ! परळी-ठोसेघर खोऱयातील गावे संपर्कहीन : ओढय़ांना आलं नदीच स्वरुप:घरांची पडझड शेतीचे नुकसान पुल पाण्याखाली

 

 

वार्ताहर

परळी

परळी ठोसेघर खोऱयात ढगफुटीसदृश्य पाऊस पडत असून पाण्याच्या प्रवाहाने अनेक गावे संपर्कहीन झाली आहेत. गावांचा संपर्क तुटल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने गावातील परिस्थितीचा आढावा प्रशासनाला येणे ही अवघड झाले आहे. पांगारे धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने खालचे पांगारे जलमय झाले आहे. पळसावडे धरणाच्या सांडव्यालाच भडगदाड पडल्याने बोंडारवाडी, सांडवली ही गावे माळीण सदृश्य परिस्थिती होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातून डोंगरातून वाहत येत असलेले पाणी नदीप्रमाणे वाहत आहे.

सोनवडी गावाजवळील आरे दरे हा पुल पाण्याखाली गेला असून या पुलाला अनेक ठिकाणी भगदाड पडले असून हा पूल धोकादायक बनला आहे. चाळकेवाडी गावच्या पुढे दरड पडल्याने चिखली जांभे भांबे या गावांचा संपर्क तुटला आहे. निगुडमाळ गावानजिक असलेल्या पुलाहून पाणी वाहत असल्याने या पुलानजिकचा भराव वाहून गेला आहे. परळी गावातून रोहोट पाटेघर जोडणाऱया पुलाला उरमोडी धरणाचे पाणी टेकले आहे. मोरेवाडी पवारवाडी येथील रस्त्यावरच विद्युत वाहिन्या लोंबकळत असल्याने तसेच मातीचा भराव वाहत आल्याने पुढील गावांचा संपर्क तुटला आहे. रेवंडे राजापुरी या दरम्यानच्या पुलाहून पाणी वाहत आहे. कास झुंटगी रस्त्यावरुन धावली फाटय़ावर रस्ता खचल्याने जळकेवाडी वाहतून ठप्प झाली आहे.

 

 

पांगारे धरणा पलिकडील बोंडारवाडी, वारसवाडी, दावन, सांडवली ही गावे संपर्क हीन

 

बोंडारवाडी सांडवली पांगारे गावात महाप्रलय

 

सोनवडी आरे दरे रस्त्यावरील पुल पाण्याखाली

 

झुंगटी धावली फाटय़ाजवळ रस्ता खचला

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular