वार्ताहर
परळी
परळी खोरे हे अतिवृष्टीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. एकदा पाऊस सुरू झाला तो कधी थांबेल याचा अंदाज लावता येत नाही. कधी कधी तर गावांचे कित्येक दिवस संपर्क ही तुटतो. या वर्षी तुलनेने पावसाचे प्रमाण कमी असले तरी परळी खोऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. काळोशी येथील तलाव हा धोकादायक स्थितीत आला असून या तलावाच्या सांडव या शेजारील भिंतीचा मातीचा भराव दिवसेंदिवस ढासळत असल्याने तलावा शेजारील घरांमधील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काळोशी येथील या तलावाचे सुमारे वीस ते तीस वर्षांपूर्वी चे बांधकाम आहे. या तलावात सुमारे 0.75 टीएमसी पाणीसाठा होतो. परंतु पावसाच्या जोरदार माऱ्याने हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे तसेच शेजारील भिंतीचा मातीचा भराव ढासळत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांनी सदर माहिती तहसीलदार तलाठी यांना कळविले असून पाठ बंधारा विभागांमध्ये चौकशी केली असता या तलावाची कोणतीही नोंद नसल्याचे निदर्शनास आले असे ग्रामस्थांनी ‘ग्रामोधार’शी बोलताना सांगितले.
सदर तलाव जर फुटला तर 20 घरांना धोका होऊ शकतो तसेच अंबवडे गावापर्यंत ओढ्याच्या बाजूला असणारे तीन किलोमीटर पर्यंत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. तसेच आंबवडे गावातील ओढ्याच्या बाजूला असणाऱ्या घरांना अंदाजे पन्नास घर व लावघर तसेच पाटेकर या गावांना जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाला धोका होऊ शकतो. तरी संबंधित प्रशासनाने काळोशी येथील तलावाचे तिवरे धरणा सारखी परिस्थिती होण्याची वाट न पाहता तत्काळ उपाययोजना करून ग्रामस्थांच्या डोक्यावरील टांगती तलवार हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.