पाटण:- कोयना शिक्षण संस्थेत गेली २८ वर्ष ज्ञानदानाचे कार्य करत क्रीडा उपशिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावलेले विद्यार्थीप्रिय शिक्षक शिवप्रेमी मनोहर यादव सर यांचा सपत्नीक सेवापूर्ती सन्मान सोहळा तसेच त्यांनी स्वतः लिहलेल्या पहिल्या “पानरेखा” काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. सूस्वाद मल्टीपर्पज हॉल म्हावशी फाटा पाटण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
या सेवापूर्ती सन्मान सोहळा व काव्य संग्रह प्रकाशन सोहळ्यास आमदार जयंत आसगावकर पुणे शिक्षक मतदार संघ, अनिल चोरमले उपसंचालक (मुख्यालय) बालेवाडी पुणे, युवराज नाईक जिल्हाधिकारी सातारा, मा. संजीवराजे नाईक- निंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, डॉ. विजय चोरमारे जेष्ट साहित्यिक पत्रकार, राजाभाऊ शेलार सभापती पाटण पंचायत समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत व सत्यजितसिंह पाटणकर युवा नेते पाटण विधानसभा मतदार संघ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चंद्रकांत पाटील, आर.वाय जाधव, डॉ. निर्मलाताई पाटील, पांडुरंग शिंदे, सारिका काळे, विश्वासराव देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन किल्ले सुंदरगड-दातेगड संवर्धन समिती पाटण, सातारा जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे, कोयना ट्रेकर्स, सांजवारा परिवार, साद सह्याद्रीची भटकंती परिवार यांनी केले आहे.
मनोहर यादव सर यांच्या सेवापूर्तीसह “पानरेखा” काव्यसंग्रहाचा शनिवारी प्रकाशन सोहळा
RELATED ARTICLES