Friday, June 20, 2025
Homeताज्या घडामोडीप्रकल्पग्रस्तांच्या पाठिंब्यासाठी कोयनानगरला कडकडीत बंद लाँगमार्चची तयारी पूर्ण * 10 व्या दिवशीही...

प्रकल्पग्रस्तांच्या पाठिंब्यासाठी कोयनानगरला कडकडीत बंद लाँगमार्चची तयारी पूर्ण * 10 व्या दिवशीही आंदोलन सुरूच

पाटण : पाटण तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे दुसर्‍या टप्प्यातील निर्णायक ठिय्या आंदोलन कोयनानगर येथील छ शिवाजी मैदानावर सुरूच आहे. गुरूवारी कोयनावासियांनी कोयनानगर कडकडीत बंद पाळून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनास पाठींबा दिला. कोयनानगर येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयनानगर सह जिल्ह्यातील वांग मराठवाडी, बामणोली, व राज्यातील 9 जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन 12 फेब्रुवारी पासून सुरु आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची अंमलबजावणीची ठोस कार्यवाही शासनाने प्रत्यक्ष सुरू केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली असून मंत्रालयावर काढण्यात येणार्‍या लाँगमार्चची तयारी पूर्ण झाली आहे.
कोयनानगर येथे पाटण तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच असून बुधवारी प्रकल्पग्रस्तांच्या पाठींब्यासाठी कोयनानगर बंदची हाक देण्यात आली होती. त्यास कोयनावासियांनी प्रतिसाद देत ऊत्फुर्तपणे कडकडीत बंद पाळला. बंदमध्ये कोयनानगर बसस्टँड परिसर, जुना माकेॅट येथील व्यापा-यांनी आपली दुकाने सकाळपासून बंद ठेवली होती. बंद काळी शासकीय कार्यालये, बंँका सुरू होत्या. एसटी बसेस वगळता खासगी वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने कोयना बसस्टँडवर शुकशुकाट जाणवत होता.
प्रकल्पग्रस्तांनी दुसर्‍या टप्प्यातील निर्णायक आंदोलन दिनांक 12 फेब्रुवारी पासून सुरु केले आहे. दिवस उलटले तरी स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. लोकप्रतिनिधीनी गतवर्षीच्या आंंदोलना दरम्यान भेट देऊन कोयनेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांचा लोकप्रतिनिधींना विसर पडला की काय? असा संतप्त सवाल कोयना प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular