Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीटोल विरोधी चळवळीत सातारा जिल्हा बार असोसिएशनची उडी

टोल विरोधी चळवळीत सातारा जिल्हा बार असोसिएशनची उडी

सातारा: आज सातारा जिल्हा न्यायालयात बार असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या मिटींगमध्ये टोल विरोधी चळवळीस जाहीर पाठींबा देत या आंदोलनात उडी मारली आहे.तशी बैठक घेण्यात आली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अरूण खोत व अ‍ॅड. वैभव मोरे यांनी चळवळीस असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड संग्राम मुंढेकर व टोल विरोधी समिति चे कायदेशिर सल्लागर ऍड वैभव मोरे यांनी चळवळीस लागणारे कायदेशीर सहकार्य करण्यात येईल, तसेच टोल देणार्‍या ग्राहकांना ग्राहक मंचाचे वतीने नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले.पाठींबा पत्र देताना अ‍ॅड. संग्राम मुंढेकर, अ‍ॅड. वैभव मोरे, अ‍ॅड. अमरसिंह काटकार, अ‍ॅड. धनंजय बर्गे, अ‍ॅड.सयाजीराव घाडगे, अ‍ॅड. जयदिप भोसले, अ‍ॅड. अमर शिर्के अ‍ॅड. संजय गव्हाणे, अ‍ॅड. ओंकार मोर,े अ‍ॅड. धुमाळ, अ‍ॅड. विनोद यादव, अ‍ॅड. संतोष बर्गे इ . तसेच टोल विरोधी सातारी जनतेच्या वतीने पाठींबा पत्र स्विकारताना रविंद्र नलवडे, अ‍ॅड. वैभव मोरे, महारुद्र तिकुंडे, ए.एम.मुल्ला, महेश महामुनी, शेखर तोडकर इ कार्यकर्ते उपस्थित होते.सातारा जिल्ह्यातील वकील मंडळींनी आंदोलनात सहभागी होऊन दिलासा दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाला आता कायद्याची बाजू भक्कम झाली असल्याचे मत सातारकरांनी व्यक्त केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular