Thursday, March 28, 2024
Homeठळक घडामोडीरिटकवली येथे दत्त जयंतीनिमित्त अखंड काकड आरती सोहळा

रिटकवली येथे दत्त जयंतीनिमित्त अखंड काकड आरती सोहळा

मेढा : रिटकवली (ता.जावली) येथे दत्तजयंती सोहळ्यानिमित्त दि.28 नोव्हेंबर ते 11डिसेंबर या काळात अखंड काकड आरती सोहळ्याचे आयोजन करणेत आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
गतवर्षीप्रमाणे या वर्षीही वै.ह.भ.प.नारायण बुवा धनावडे यांचे आशिर्वादाने व व्यासपीठ चालक ह.भ.प.भास्करराव धनावडे यांचे प्रमुख उपस्थित काकड आरती, किर्तन, भजन, जागरण अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजण करणेत आले आहे. यामध्ये रिटकवली,वागदरे, बिभवी, ओझरे, गोंदेमाळ, कण्हेर या गावच्या सुस्वर भजनाचा कार्यक्रम आहे.
दि.10 डिसेंबर रोजी सांयकाळी 5ते6ज्ञानेश्वरी हरिपाठ व सायं.6 ते 7 दिपोत्सवाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमास जावलीचे तहसिलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, सपोनि नीलकंठ राठोड, ह.भ.प. लक्ष्मण मिस्त्री, ह.भ.प.सुहास गिरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दि.11 डिसेंबर रोजी पहाटे 5 ते 8सार्वजनिक काकड आरती, सकाळी 10ते 12भजनाचा कार्यक्रम, 12.15 वा.श्री. दत्तजन्मकाळ सोहळा, दुपारी 1ते3 ह.भ.प.रघूनाथ महाराज मर्ढेकर, यांचे काल्याचे किर्तन 3ते5 भव्यदिंडी मिरवणुक सोहळा, सांय.5ते8 महाप्रसादाचे आयोजन करणेत आले असून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करणेत आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular