सातारा …- स्वतःचे एक घर असावे हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. यासाठीच आता राज्य व देशपातळीवरही मोठया प्रमाणावर शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शासनाने पंतप्रधान आवास योजना व अन्य योजनांचा शुभारंभ केला आहे. यासाठी शासन व बिल्डर्स असोसिएशन यांनी एकत्र येवून पुढील काळात सर्व सामान्यांना परवडणारी घरे म्हणजेच ऑफोर्डेबल हाऊसेस या संकल्पनेवर काम करावे. कारण घर बांधणे आजच्या घडीला सोपी गोष्ट राहिली नाही. बांधकाम व्यावसायिकांनी व्यवसाय करताना सचोटी, विश्वासार्हता आणि गुणवत्तापुर्वक सेवा दिल्यास त्याचा फायदा सगळयांनाच होतो. रिअल इस्टेट इंडस्ट्री मध्ये गुणवत्ता आणि प्रमाण ठरवणे गरजेचे आहे ,तरच भविष्यात या क्षेत्राची प्रगती होऊ शकते. आजच्या घडीला केवळ शहरांच्या विकासाचा विचार न करता ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुध्दा बिल्डर्स असोसिएशनच्या सदस्यांनी प्रयत्न करावेत असे उद् गार सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी काढले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया , सातारा शाखेच्या वतीने आयोजित रचना 2017 या बांधकाम विषयक सर्वकाही असणार्या प्रदर्शनाच्या उद्धाटन प्रसंगी अश्विन मुद्गल बोलत होते. रचना 2017 या बांधकाम विषयक प्रदर्शनाचे भव्य दिव्य उद्धाटन श्री. अश्विन मुद्गल यांचे हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष राजू भोसले, लक्ष्मी स्टीलचे मनोज जैन, एसएस कॉनमॅट कंपनीचे संकेत पाटील, कुपर कार्पोरेशनचे असलम फरास, बि.ए.आय. चे नॅशनल ट्रस्टी विजय देवी, बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष मंगेश जाधव, उपाध्यक्ष जाकीर मिर्झा, सेक्रेटरी चंद्रसेन जाधव, खजिनदार मितीन लोखंडे, कौन्सिल मेंबर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अश्विन मुद्गल म्हणाले की, सातारा जिल्ह्याची भौगोलिक, समााजिक, आर्थिक परिस्थीती चांगली असून बांधकाम क्षेत्रात इथे भरपुर संधी आहे त्या संधीचा फायदा घेऊन बिल्डर्स असोसिएशनच्या सदस्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. यावेळी त्यांनी रचना या प्रदर्शना विषयी गौरवोद2गार काढताना सांगितले की पुणे, मुंबई, बेंगलोर या महानगरांमध्ये होणार्या प्रदर्शनांच्या
तोडीस तोड हे प्रदर्शन असून सातारसारख्या मध्यम आकाराच्या शहरात अशा प्रकारचे प्रदर्शन सलग दहावेळा साकारणे ही सोपी गोष्ट नाही. बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष मंगेश जाधव म्हणाले की, सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण पश्चिम महाराष्ट्राला भूषणावह ठरेल असे रचना 2017 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य मंडप, आकर्षक प्रवेशद्वार, लाईट सिसटीम्स, आकर्षक स्टॉल्स असे या प्रदर्शनाचे भव्य दिव्य आयोजन आहे. रचनाच्या यशस्वी आयोजनाचे हे दहावे वर्ष आहे. लोकांकडूनही या उपक्रमाला वाढता प्रतिसाद आहे. प्रदर्शनास भेट देणार्यांची संख्याही दरवेळी वाढत आहे. यावेळी सुमारे चार लाखापेक्षा जास्त नागरिक भेट देतील ही अपेक्षा आहे. यावेळी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने उद्घाटक अश्विन मुद्गल यांचा सन्मानचिन्ह, बुके देऊन असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश जाधव यांनी तर नगर परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांचा सत्कार चंद्रसेन जाधव यांनी व प्रदर्शनाचे प्रायोजक, सहप्रायोजक यांचा सत्कार जाकीर मिर्झा व विजय देवी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल दातीर यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सेक्रेटरी चंद्रसेन जाधव यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी रचना प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सची पहाणी करून माहिती घेतली.
रचना प्रदर्शन हे सातारा जिल्हा परिषदेच्या भव्य मैदानावर दि. 26 ते 29 जानेवारी 12017 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत आयोजित केले असून प्रवेश विनामुल्य आहे. सदर प्रदर्शनास सवारनी सहकुटुंब आवर्जून भेट द्यावी असे आवाहन बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेतर्फे करण्यात आले आहे.
स्पंदन फाऊंडेशन तर्फे रचना येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
रचना 2017 हे वास्तुविषयक प्रदर्शन आयोजित करत असतानाच सामाजिक बांधिलकीच्या नात्याने बीएआय व स्पंदन फाऊंडेशन यांनी एकत्र येऊन दि. 28 व 29 जानेवारी रोजी रचना प्रदर्शनस्थळावर सकाळी 11 ते 5 यावेळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.