फलटण (अशोक भोसले ): श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण तालुक्यातील शेवटच्या मुक्कामासाठी आज शुक्रवार दि.5 जुलै रोजी बरड ता.फलटण येथे येणार असुन यासाठी ग्रामपंचायत बरड यांचे वतीने संपुर्ण सुविधा निर्माण केल्या असुन लाखो वारकरी भाविक भक्तांसाठी पिण्याचेस्वच्छ पाणी, राहण्यासाठी जागा, तात्पुरती शौचालये व आपल्या घरातील शौचालये देण्याचा एकमुखी निर्णय घेवुन एकवेगही आगळी पंरपरा जोपसणयचा माणस ग्रामस्थांनी केल्याने यानिर्णयाचे स्वागत होत आसून बरड नगरी आपल्या लाडक्या माऊलीची आतुरतेने वाट पाहत आहे. फलटण पं.स.महसुल विभाग आरेाग्य विभाग यांची यत्रंणा सज्ज झाली असुन गत वर्षीचा अनुभव घेता चिळल होवु नये म्हणून पालखी तळावर सिमेंट कट्याचे बांधकाम करण्यात आले असून संपुर्ण परीसर स्वच्छ करण्यात आला असून येणार्या भाविक भक्तांची संख्या लक्षात घेता पालखी तळाच्या पश्चिमेला ठिकठिकाणी तात्पुरती शौचालये तयार करण्यात आली असुन यांच बरोबर 5 ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी विशेष टॅकर भरणा पॅईट पुनर्वसन गावठाणच्या पुर्वेस तयार करण्यात आले आहे या ठिकाणी पुरेशे पाणी उपलब्ध करून दिले असुन यांच ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने पथके कार्यरत असुन या ठिकाणा हुन पिण्याचे पाणि दिले जाणार असल्याची माहीती प्रभारी गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिली.
यावर्षी बरड ग्रामपंचायत पं.स.फलटण यांचे संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त निर्मल वारी संकल्पनेतुन प्लास्टिक वस्तुचा वारप विक्री होवु नये यासाठी नागरीकांना अवाहन करण्यात आले आहे.तथापी दुकानदार यांना या बाबत लेखी व तोंडी सुचना देण्यात आले असुन जेवणासाठी प्लास्टिक पत्रावळी व द्रोण न वापरता त्या पत्रावळी पानांच्या वापरण्यासाठी ग्रामस्था व वारकरी यांना अवाहन करण्यात आले आहे.तसेच ग्रामपंचायत बरड आरोग्य विभागाने सार्वजनिक शौचालयांची स्वच्छाता गटाराची स्वच्छता कर्णयात आली असुन वारकरी भक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासंदर्भात प्रांतअधिकारी संतोष जाधव तहसिलदार हनुमंत पाटील यांनी सुचना केल्या असुन माऊलीच्या स्वागतासाठी महसुन प्रशासन सज्ज झाले असून बरड नक्षरी आपल्या लाडक्या माऊलीच्या प्रतिक्षेत आहे.
कोणताही अनुचीत प्रकार घडुनये म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकक्षक प्रभारी गरूड यांनी ग्रामिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी.डी.सांवत यांना मार्गदर्शन केले असुन त्यांनी बरड पालखी तळावरील आवश्यकती खबरदारी घेण्यासाठी आढावा बैठक घेतली असुन सी.सी.टिव्ही पोलीस बंदोबस्त केला आहे
माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी बरड नगरी आतुरली
RELATED ARTICLES