मेढा प्रतिनिधी – पत्रकारांना संरक्षण मिळावे,पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्यानंतरही पत्रकारांवर होत असलेले हल्ल्यांच्या निषेधार्थ जावली तालुका पत्रकार संघाच्या वतीने “पत्रकार संरक्षण कायद्याची होळी”जावली तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी पाचोरा जिल्हा जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्य शिव्या आणि नंतर त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला असून महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा आला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हल्ल्याच्या घटना वाढल्या असून राज्यात गेल्या वर्षभरात ४६ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.पोलिस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करणेकामी टाळाटाळ केली जात असल्याने या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी”करण्यात आली आहे.
त्यानंतर राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी होऊन जे या कायद्याचा भंग करतील त्यांवर कठोर कारवाई करावी अशी आमची भूमिका राज्य शासनाला कळवावी या करीता सर्व पत्रकारांचे वतीने जावलीचे नायब तहसिलदार यांचेकडे निवेदन देण्यात आले.
या वेळी जावली तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संस्थापक,ज्येष्ठ पत्रकार नारायणराव शिंगटे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत गुजर,उपाध्यक्ष अभिजित शिंगटे,सचिव धनंजय गोरे ,खजिनदार सोमनाथ साखरे,सुरेश पार्टे, मोहन जगताप, भास्कर धनावडे, संजय दळवी, रघुनाथ पार्टे, बजरंग चौधरी, युवराज धुमाळ, आणि तालुक्यातील पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी पत्रकारांच्या एकजुटीचा विजय असो, पत्रकारावर भ्याड हल्ले करणाऱ्या व पत्रकारांना अपमानित करणाऱ्या वृत्तीचा निषेध असो, पत्रकार संरक्षण कायदयाची कडक अंमलबजावणी करा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला . उपस्थितांनी तालुक्यातील पत्रकारांची एकजुट पाहून समाधान व्यक्त केले.यावेळी जेष्ठ पत्रकार नारायणराव शिंगटे, जावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत गुजरविजय सपकाळ यांनी आपली मनोगते व्यक्त करून पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करून पत्रकार संरक्षण कायद्याची योग्य ती अंमलबजावणी व्हावी असे आवाहन केले .जावली तालुका पत्रकार संघाचे सचिव धनंजय गोरे यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले
पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जावली तालुका पत्रकार संघाच्या वतीने “पत्रकार संरक्षण कायद्याची होळी”
RELATED ARTICLES