Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीफलटण शहरात मोकाट फिरणार्‍या वळूचा ऊच्छाद

फलटण शहरात मोकाट फिरणार्‍या वळूचा ऊच्छाद

अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न; नागरिकांच्यात भीतीचे वातावरण
फलटण : फलटण शहरात मोकाट फिरणार्‍या एका वळूने ऊच्छाद मांडून रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ माजली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही परंतु या घटनेमुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. फलटण नगर परिषदेच्या कर्मचारी यांनी अत्यंत चोखपणे परिस्थिती हाताळत त्या वळूस पकडून फलटण हद्दीच्या बाहेर सोडल्याने
काल दि. 4 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून फलटण शहरातील हडको परिसरात मोकाट फिरणार्‍या एका वळूने रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ माजली. सकाळी मुलांना शाळा भरण्याची वेळ असल्याने लहान मुले व पालक यांच्या अचानकपणे अंगावर धावून जाण्यास सुरवात केल्याने पळापळ झाली. यानंतर फलटण नगर परिषदेच्या कर्मचारी यांना याबाबत अवगत करण्यात आले. नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी वेळीच उपाययोजना करत नागरिकांना वळू असलेल्या ठिकाणी जाण्यापासून रोखले. फलटण शहरातील रहदारीच्या ठिकाणी वळू गेला असता तर फार मोठा अनर्थ झाला असता. नगर परिषद कर्मचारी यांनी वळूस गोळीबार मैदान व विद्यानगर परिसरात जाण्यास भाग पाडले व एका रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला ट्रॅक्टर व इतर वाहणे लावून रस्ता बंद केला व त्या रस्त्याने वळूस जाण्यास भाग पाडून वाहणे लावून रस्ता बंद केला. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी फलटण यांना भुल देण्यास बोलण्यात आले असता सबधित अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्याकडे हे काम येत नाही असे सांगितले व याबाबत मार्गदर्शन मागवून बघू असे उर्मट उत्तर दिले.
पशुवैद्यकीय अधिकारी फलटण व कर्मचारी यांनी एवढ्या मोठ्या प्रसंगी वळूस भुल देऊन पकडण्यासाठी नकार दिल्याने नगर परिषद कर्मचारी व नागरिक यांच्यापुढे मोठा प्रश्न उपस्थित झाला. शेवटी नगर परिषद कर्मचारी व नागरिक यांनी पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना फोनद्वारे जाब विचारला असता पशुवैद्यकीय कर्मचारी यांना घटनास्थळी भुल देण्यासाठी पाठविले. यानंतर दोरीच्या सहाय्याने नगर परिषद कर्मचारी व नागरिक यांनी वळूस पकडण्याचा प्रयत्न केला. अनेक तासांच्या अथक प्रयत्नाने वळूस दोरीने बांधून भुल देण्यात आली. यानंतर वाहणाने फलटण शहराच्या बाहेर सोडण्यात आले. यावेळी फलटण नगर परिषदेचे विनोद जाधव, तुळशे, प्रकाश पवार, आवळे व इतर कर्मचारी यांनी फार कष्ट करून पकडण्यासाठी मदत केली त्यांचे नागरिकांनी कौतुक करून आभार मानले.
चौकट
फलटण शहरात फिरणार्‍या अशा मोकाट जनावरांना वारंवार पकडण्याची मागणी होऊनही आजअखेर फलटण नगर परिषद यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने पुन्हा अशी घटना घडू शकते हे आजच्या घटनेने सिध्द झाले आसुन नागरिकांच्या मधून मोकाट जनावरे पकडण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular