दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रामनाथ कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. रामनाथ कोविंद यांचा जन्म ०१ ऑक्टोबर १९४५ ला उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका छोट्या गावात झाला. २ वेळा ते राज्यसभेचे सदस्य होते. उत्तरप्रदेशातून १९९४ ते २००० आणि नंतर २००० ते २००६ राज्यसभेवर खासदार होते. रामनाथ कोविंद हे वकील आहेत आणि दिल्लीच्या उच्च न्यायालयात ते प्रॅक्टिस देखील करत होते. आदिवासी, होम अफेअर, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस, सामाजिक न्याय, कायदा व सुव्यवस्था आणि राज्यसभा हाऊस कमेटीचे ते चेअरमन होते.
बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद एनडीएचे राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार
RELATED ARTICLES