साताराः कॉ. पानसरे हत्या प्रकरणात पुरोगामी संघटनांच्या दबावापोटी सनातन संस्थेचे निष्पाप साधक समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली. समीर यांच्या अटकेनंतर तथाकथित पुरोगाम्यांनी निदर्शने, आंदोलने, प्रक्षोभक भाषणे आणि मॉर्निंग वॉकसारखी नाटके करून सनातन संस्थेलाच यात गोवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैव म्हणजे महाराष्ट्राचे एक कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून नावाजलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील हेही या मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी झाले. इतका दबाव असतांनाही मा. न्यायालयाने समीर गायकवाड यांना जामीन संमत करून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका गरीब तरुणावर होणारा अन्याय दूर केला. त्याविषयी आम्ही मा. न्यायालयाचे आभार व्यक्त करतो. समीर यांना अटक झाल्यापासून पुरोगाम्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. तरी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता समीर यांच्या जिवाला धोका असल्याने शासनाने समीर यांना संरक्षण देण्याची आवश्यक आहे, अशी एकमुखी मागणी 18 जून 2017 या दिवशी हिंदुत्वनिष्ठांच्या कोल्हापूर येथे हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आली. या वेळी वंदे मातरम यूथ ऑर्गनायझेशनचे अवधूत भाट्ये, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, शिवसेनेचे रणजित आयरेकर, हिंदु एकता आंदोलनाचे शिवाजीराव ससे, हिंदु जनजागृती समितीचे सुधाकर सुतार, प्रीतम पवार, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदुत्वनिष्ठ गोविंद देशपांडे उपस्थित होते.
समीर गायकवाड यांना पुरोगाम्यांपासून धोका; संरक्षण देण्याची हिंदुत्वनिष्ठांची मागणी !
RELATED ARTICLES