प्रियांका मोहिते ने केले माउंट अन्नपूर्णा शिखर सर ; सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा.

सातारा :- सातारची सुप्रसिद्ध गिर्यारोहक म्हणून ओळख असलेल्या प्रियांका मंगेश मोहिते हिने शुक्रवारी जगातील 10 व्या क्रमांकाचे माउंट अन्नपूर्णा हे शिखर सर केले आहे. हे शिखर सर करणारी ती देशातील पहिली महिला  ठरली असल्याने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. प्रियांका यानंतर लगेचच जगातील सातव्या क्रमांकाचे माउंट धवलगिरी शिखर चढण्यासाठी कूच करणार आहे असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले .प्रियांकान 8,0 95 मीटर म्हणजेच 26,545 फूट उंचीच्या पर्वतावर यशस्वी गिर्यारोहण केले आहे. तसेच सर्वात लहान वयात मकालू शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा बहुमानही प्रियांकाच्या नावावर आहे .तसेच आता अन्नपूर्णा शिखर सर करणारी प्रियांका ही पहिलीच भारतीय महिला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .अन्नपूर्णा शिखर सर केल्यावर प्रियांका जगातील सातव्या क्रमांकाचे 8167 मीटर म्हणजेच 26 हजार 795 फूट उंचीच्या भाऊला गिरी शिखरावर गिर्यारोहन करण्यास प्रारंभ करणार आहे.