सातारा : महाड दुर्घटनेचे वार्तांकन करणार्या साम टिव्हीच्या प्रतिनिधीशी उद्धट वर्तन करणारे महाडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांचा आज जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी निषेध केला. त्यांना पदच्युत करण्याच्या मागणीचे निवेदन सर्व पत्रकार संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना देण्यात आले.
महाड येथील सावित्री नदीच्या पुलाच्या दुर्घटनेचे वार्तांकन करणारे साम टिव्हीचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांच्याशी काल महाडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी उद्धट वर्तन केले. तसेच पत्रकारांच्या कार्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांना धक्का-बुक्की केली. या घटनेचे कालपासून राज्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. विविध राजकीय व सामाजिक व पत्रकारांच्या संघटनांनी या गोष्टीचा निषेध करत मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जिल्ह्यातही याचे तीव्र पडसाद उमटले. आज सकाळी इलेकट्रॉनिक मिडिया असोसिएशन, जिल्हा पत्रकार संघ व सातारा पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासोर जून मेहता यांच्या कृतीचा निषेध केला. या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, इलेकट्रॉनिक मिडिया असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जाधव. सकाळचे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शरद काटकर, दीपक प्रभावळकर, मधुसूदन पत्की, प्रवीण जाधव, गिरीश चव्हाण, पांडुरंग पवार, मोहन मस्कर-पाटील, सम्राट गायकवाड, अजित जगताप, समाधान हेंद्रे, तुषार तपासे, ओंकार कदम, महेश नलवडे, संतोष नलवडे, सनी शिंदे, अमित वाघमारे, गुरुनाथ जाधव, पांडुरंग बर्गे, विशाल पाटील, करीम मुलाणी, प्रमोद इंगळे, प्रकाश वायदंडे तसेच पत्रकार संघाचे सदस्य, सकाळचे व्यवस्थापक राजेश निंबाळकर, मेलवीन डिमेलो, विजय जगताप आदि उपस्थित होते. तसेच मेहता यांच्या राजीनाम्याची तसेच पत्रकार संरक्षण कायदा तातडीने अमलात आणण्याची मागणी केली.
जिल्ह्यातील पत्रकारांच्या भावना व मागण्या मुख्यंत्र्यांपर्यंत पोचविण्यासाठी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे देण्यात आले. पत्रकारांशी अशा प्रकारे उद्धट वर्तन करणार्या लोकप्रतिनिधींशी संघटितपणे लढा दिला जाईल असा इशारा या वेळी पत्रकार संघांच्या पदाधिकार्यांनी दिला