सातारा : खंबाटकी घाटात भैरवनाथ वळना जवळ पुण्यावरून विटाकडे जाणारी एसटीबस पुलाला धडकली. या अपघातात बस मधील 20 प्रवासी जखमी झाले, तर 2 प्रवासी गंभीर जखमी झाले. या जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेत असतानाच खंडाळा बोगद्यातून उलट्या दिशेने ही रुग्णवाहिका जात असताना समोरून येणार्या पारगाव एसटीची या रुग्णवाहिकेला जोरदार धडक बसली. यामध्ये अपघातातील जखमींना रुग्णालयात नेणारा चालक गंभीर जखमी झाला.
खंबाटकी घाटात एसटी बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेताना त्याच जखमींच्या रुग्णवाहिकेला विचित्र अपघात झाल्याने, जखमी प्रवाशांना दोन वेळा अपघाताला सामोरे जाण्याची वेळ आली.