सातारा : एसटीचे चाक अंगावरुन गेल्याने वृध्देचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोरेगावचा येथे दुपारी पाऊणे तीनच्या सुमारास श्रीमती मुक्ताबाई बोराटे (वय 66, रा. तडवळे संमत, कोरेगाव, ता. कोरेगाव) या आठवडा बाजार करुन घरी निघालेल्या होत्या. श्रीमती बोराटे एसटीत बसल्यानंतर त्या तडवळे संमत कोरेगाव या एसटी स्टॉपवर उतरल्या. व त्या एसटीच्या समोरुनच पलिकडे जात होत्या.
यावेळी एसटी चालकाच्या काही लक्षात येण्यापुर्वीच एसटीचे चाक बोराटे यांच्या अंगावरुन गेले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.