साताराः प.पू.सदगुरू साईरंग महाराज यांची पुण्यतिथी उत्सव शनिवार दि.23 मार्च 2019 रोजी आयोजित केल्याची माहिती गोडोली येथील साईबाबा मंदिराचे प्र. अध्यक्ष प्रसाद शिंदे व विश्वस्त प्रभाकर कांबळे यांनी दिली. यानिमित्त पहाटे 5.30 ते 5.50 काकड आरती, होमहवन विधी व आरती, दु. 12 वा. मध्यान्ह आरती, 12.30 वा. महाप्रसाद, दु. 1 ते 4 साईरंग महाराज अनुभव कथन व भजन, 4 ते 6 प्रवचन, अर्जुन जमदाडे सातारा यांचे होईल. 6.25 वा.सांजआरती, 7 ते 9.50 भजन, 9.55 वा. शेजारती होईल. संपूर्ण दिवस ग्रंथ, साईबाबांच्या महावस्त्रांची विक्री होईल.
सदगुरू साईरंग महाराज यांचा शनिवारी पुण्यतिथी उत्सव
RELATED ARTICLES