सातारा :-.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्यावरून सध्या सर्वत्र टीका होत आहे. सातारा शहरात भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटना आणि धारकर यांनी मोर्चा काढला .तसेच समर्थकांकडून पवई नाक्यावर शिवतीर्थ परिसरात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला माध्यमानी भिडे यांचा एकेरी उल्लेख टाळावा अशी आग पाखड देखील समर्थकांनी यावेळी केली. भिडे गुरुजींबद्दल बोलताना बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार विद्या ठाकूर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली .भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ निघालेल्या या मोर्चात महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
साताऱ्यात संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा
RELATED ARTICLES