महाबळेश्वर ः महाबळेश्वर तालुक्याच्या आर्थिक विकासाची गंगोत्री म्हणून जिचा नाव लौकिक आहे ती दि महाबळेश्वर अर्बन हि तिच्या सभासदांना केवळ आर्थिक पुरवठा करणारीच संस्था नसून तिचे सामाजिक व मानवतावादी काम हि फार मोठे आहे.या अर्बन बॅकेने सातारा हॉस्पिटल व रिसर्च सेंटर , सातारा डायग्नोस्टिक सेंटर अॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल , माई हेल्थ केअर सर्व्हिसेस सातारा यांच्या मदतीने येथे जे मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबीराचे आयोजन करण्याचा उपक्रम केला व त्यास शहरासह परिसरातील नागरिकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद हि अत्यंत उल्लेखनिंय बाब आहे .बँकेने अशा प्रकारचे मानवतावादी काम करीत राहावे .आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अशा वैद्यकीय शिबिरांची फार महत्वाची गरज आहे .असे कौतुक उदगार महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे यांनी काढले .
दि महाबळेश्वर अर्बन बॅकेने सातारा हॉस्पिटल व रिसर्च सेंटर , सातारा डायग्नोस्टिक सेंटर अॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल , माई हेल्थ केअर सर्व्हिसेस सातारा यांच्या संयुक्त मदतीने सभासद, महाबळेश्वर शहर व परिसरातील नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन केले होते तिचा शुभारंभ महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा सौ.स्वप्नाली शिंदे यांच्या हस्ते फीत कापून आणि सातारा येथील सुप्रसिद्ध डॉ.सुरेश शिंदे यांच्या हस्ते रुग्णाची तपासणी करून व महाबळेश्वर अर्बन बँकेचे चेअरमन राजेश उर्फ बंद कुंभारदरे,व्हा.चेअरमन चंद्रकांत बावळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात नगराध्यक्षा सौ.शिंदे यांनी वरील उदगार काढले. यावेळी यावेळी डॉ अनिल शिंदे सर्जन , डॉ संग्राम देशमुख मेडीसीन , डॉ कांचन कलवले सी ए ओ , डॉ राजेश वाघ अस्थिरोग तज्ञ , डॉ निलम देशमुख स्त्री रोग तज्ञ , डॉ आदित्य महाजन त्वचारोग तज्ञ , डॉ प्रल्हाद ननावरे ,वैद्यकीय अधिकारी महाबळेश्वरचे डॉवाय .के.शिमरे ,डॉ. दबडे तसेच सहाय्यक निबंधक महाबळेश्वर शिरीष कदम , महाबळेश्वरचे उप नगराध्यक्ष अफझलभाई सुतार ,नगरसेवक रवींद्र कुंभारदरे,कुमार शिंदे ,किसंशेथ शिंदे ,नगरसेविका सौ.उज्वला तोष्णीवाल ,सौ. विमल ओंबळे,सौ.शारदा ढाणक,माजी नगराध्यक्षा जयवंती जाधव ,माजी नगराध्यक्ष डी .एम. बावळेकर ,माजी संचालक रमेश शिंदे ,सुनील यादव ,सुरेश शिंदे ,शिवसेनेचे माजी उप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ दादा सकपाळ ,महाबळेश्वर तालुका वकीला संघ अध्यक्ष विजयकुमार दस्तुरे वकील ,शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. लीलाताई शिंदे ,पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजित खुरासने,जेष्ठ पत्रकार विलास काळे ,भाजपा च्या उषाताई ओंबळे ,मनसेचे राजेंद्र बावळेकर ,राजेंद्र पवार ,सह्याद्री ट्रेकर्स चे अध्यक्ष संजय पार्टे ,बेल एअर हॉस्पिटलचे प्रमुख फादर टोमी,वसंत मोरे ,गोपाल लालाबेग ,राजश्री भिसे आदी मान्यवर उपस्थित होते .
बँकेचे चेअरमन राजेश कुंभारदरे यांनी सर्व रोग निदान शिबीर घेण्या मागील उद्देश विषद केला .तसेच या शिबिराचा फायदा भविष्यात आज नोंद केलेल्या महाबळेश्वर वासियांना निश्चित होईल, त्यांना कधी तपासणीसाठी वा वैद्यकीय सल्ल्यासाठी सातारा येथे जाण्याची वेळ आली तर त्यांना बँकेने आयोजित केलेल्या शिबिरामुळे व त्या मध्ये घेतलेल्या सहभागामुळे सातारा हॉस्पिटल व रिसर्च सेंटर , सातारा डायग्नोस्टिक सेंटर अॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल , माई हेल्थ केअर सव्र्हिसेस सातारा यांच्यामार्फत सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाईल असा विश्वास यावेळी चेअरमन कुंभारदरे यांनी व्यक्त केला
तसेच या वैद्यकीय शिबिरास मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केल्याबद्धल दैनिक ऐक्य ,सातारचे संपादक श्री .शैलेन्द्र पळणीटकर यांचे विशेष आभार मानले . यावेळी डॉ अनिल शिंदे सर्जन , डॉ संग्राम देशमुख मेडीसीन , डॉ कांचन कलवले सी ए ओ , डॉ राजेश वाघ अस्थिरोग तज्ञ , डॉ निलम देशमुख स्त्री रोग तज्ञ , डॉ दिपांजली पवार मधुमेह तज्ञ , डॉ आदित्य महाजन त्वचारोग तज्ञ , डॉ प्रल्हाद ननावरे व डॉ विकास जाधव मुख्य वैदयकिय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी महाबळेश्वरचे डॉ.वाय .के.शिमरे ,डॉ. दबडे ,तसेच त्यांचा सुमारे 35 जणांचा तज्ञ स्टाफ यांच्या मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली .सुमारे 450 रुग्णांनी आजच्या शिबिराचा लाभ घेतला त्या महिलांचे प्रमाण विशेष उल्लेखानिंय होते .
याशिबिरात रक्तदाब ,मधुमेह ,हृदयरोग ,त्वचा रोग ,अस्थी रोग ,महिलांच्या निगडीत सर्व आजार यांच्या तपासण्या व निदान सर्व तज्ञ व नामांकित डॉक्टर्स यांच्या मार्फत करण्यात आल्या .
प्रारंभी अर्बन बँकेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत चेअरमन राजेश कुंभारदरे ,व्हा. चेअरमन चंद्रकांत बावळेकर , संचालक मंडळ तसेच मुख्य व्यवस्थापक उमेश बगाडे यांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्र संचालन फकीरभाई वलगे यांनी केले . शिबिराचे आयोजन करण्यात बँकेचे संचालक युसूफ शेख बाळासाहेब कोंढाळकर, दत्तात्रय वाडकर ,सौ.वृषाली डोईफोडे ,समिर सुतार ,दिलीप रिंगे ,सचिन धोत्रे, बाबू कात्रट ,सौ.संगिता तोडकर ,नंदकुमार वायदंडे ,इरफान शेख ,जावेद वलगे ,संजय संभाजी पारठे,मुख्य व्यवस्थापक उमेश बगाडे, शाख व्यवस्थापक बाळकृष्ण साळुंखे, रमेश सीताराम जाधव ,सल्लागार मनोज ताथवडेकर ,विजय दस्तुरे वकील ,सुरेश शिंदे ,अफझल पटेल ,गजानन फळणे,नंदकुमार बावळेकर तसेच बँकेचा सर्व कर्मचारी वृंद यांचा सिहाचा वाटा आहे .
दि महाबळेश्वर अर्बन बॅकेने आयोजित केलेल्या मोफत सर्वरोग निदान – तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES