मेढा ( अभिजीत शिंगटे) :- सातारा जावली मतदार संघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली दमदार वाटचाल सुरू ठेवली असून महा विकास आघाडी मधून अमित दादा कदम यांची उमेदवारी निश्चित झाल्याने जावली मतदार संघात या वेळी काही बदल होणार का ? विरोधकांची वज्रमूठ परिवर्तन करणार का याकडे संपूर्ण जिल्याचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणुकीत सातारा जावली मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत नाव प्रसिद्ध असलेने त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी म्हणून विविध भागातील पदाधिकारी,कार्यकर्ते कामाला लागले आहेत..मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेली विविध विकास कामे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावली मतदार संघात केलेला विकास पाहता आपले स्थान भक्कम निर्माण केले असले तरी महा विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना विरोध होणार आहे.
सातारा जावली मतदार संघ हा नेहमी चर्चेत असणारा मतदार संघ आहे..सातारा जावली मतदार संघात शिवसेनेच्या माध्यमातून आमदार म्हणून निवडून आलेले आणि विविध विकास कामे केलेले माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, एस. एस. पार्टे, यांना मानणारा गट आजही कार्यरत असून त्यांना विविध भागातील सेनेचे पदाधिकारी यांची साथ असून त्यांची होणारी मदत दुर्लक्ष करून चालणार नाही अमित कदम त्यांनी घेतलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून लढण्याची भूमिकेमुळे
रंगत वाढली आहे.,
एकंदरीत सातारा जावली मतदार संघात राजकीय वातावरणच चांगलेच तापले आहे.या वेळी दोन्ही बाजूचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही आपलाच उमेदवार निवडून आणण्याचा निर्णय घेतला असून महायुती आणि महविकास आघाडी सत्तेचा सारीपाट कसा सर करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे.