सातारकरांना कंकणाकृती सूर्यग्रहणाचे ओझरते दर्शन

 

 

 

सातारा : चालू दशकातील शेवटचे कंकण कृती सूर्यग्रहण दिसावे यासाठी सातारकर सकाळपासून सज्ज झाले होते. पण, ढगाळ वातावरणामुळे या सूर्यग्रहणाचे ओझरते दर्शन मिळाले. हे दर्शन पाहण्यासाठी कॅमेरा,गॉगल, मोबाईल फोन सोबत एक्सरे फिल्मचा वापर करण्यात आला.
रविवारी दि २१ जून रोजी चंद्रा च्या सावलीचे मार्गक्रमण पृथ्वी वरून आफ्रिका खंडाकडे सुरू झाला आहे. हा उत्तर गोलार्थातील सर्वात मोठा दिवस ठरला आहे. याचे प्रतिबिंब आशियाई खंडातील देशा सोबत अरब राष्ट्राच्या भागात दिसले आहे. या सुर्यग्रहणाचे दर्शन घेण्यासाठी सातारा जिल्ह्यात अनेक जण डोंगर पठार व बाल्कनी, टेरिस वर वाट पाहत होते. ढगाळ वातावरणामुळे अनेकांना पूर्ण सूर्य ग्रहण पहाता आले नाही. दुपारी दिड वाजल्यानंतर आभाळ स्वच्छ दिसत होते. सूर्य ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये याची वारंवार पालकवर्गाकडून सूचना केली जात होती. तर सुर्यग्रहणाच्या मुळे कोणताही मानवी जीवनात प्रतिक्रिया उमटत नाही. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या विद्रोही सांस्कृतिक चळवळ संघटनेच्या माध्यमातून लोकांनी विशेषतः सातारकरांनी अंधश्रद्धा न बाळगता या सुर्यग्रहणाचा आनंद घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करून जनजागृती केली होती. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात साचलेले पाणी, आरसा व गुळगुळीत फरशीवर या सुर्यग्रहणाचे प्रतिबिंब पाहून आपल्या मनातील उत्सुकता पूर्ण केली. तर काहींनी जुन्या एक्सरे फिल्मचा वापर सूर्यग्रहण पाहण्यासाठी करून उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहणे टाळले आहे. या मध्ये शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता अशी माहिती साताऱ्यातील ग्राफिक डिझायनर प्रज्ञा विलास वहा गावकर व इतरांनी दिली आहे