Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीपाटण शहराच्या विकासासाठी आप-आपसातील मतभेद विसरून एकत्र या :- सत्यजितसिंह पाटणकर

पाटण शहराच्या विकासासाठी आप-आपसातील मतभेद विसरून एकत्र या :- सत्यजितसिंह पाटणकर

पाटण: – पाटण शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातुन कोट्यावधी रुपंयांची  विविध विकास कामे होत आहे उर्वरीत विकास कामे सुरू होतील ही कामे पुर्ण करण्या साठि व पाटण शहराच्या विकासा साठी आपण सर्वानी आप आपसातील मतभेद विसरुण एकत्र या असे अवाहन युवा नेते सत्यजीसिहं पाटणकर यांनी केले
पाटण शहरातील प्रभाग .क्रमांक १, ८, ९, १०, ११, १२, १५, आणि २६ येथील विविध विकास कामांचा शुभारंभ सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या हस्ते झाला त्या वेळी ते बोलत होते या वेळी पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दीनकरराव घाडगे .खरेदी विक्री संघाचे चेअरमन अविनाश जानुगडे, नगरसेवक किरण पवार, अजय कवडे, सचिन कुंभार, संजय चव्हाण, सचिन देसाई, नगरसेविका संगीता जाधव, प्राजक्ता भिसे, सरस्वती खैरमोडे, रश्मी राऊत, संगिता चव्हाण, योगिता कुंभार, रविंद्र सोनावले, चद्रकांत मोरे, गणेश मोरे, चंद्रहार निकम, धर्यशिल पाटणकर, किशोर कदम, राजेंद्र राऊत, आबासाहेब भोळे, दिपकराव भोळे, विकास ढवळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले की आपण आपल्या पाटण शहरात या पुर्वी करोडो रुपयांची कामे विक्रमसिहं पाटणकर यांच्या माध्यमातुन केली आहेत. मात्र पाटण शहर झपाट्याने वाढत गेले तसे लोकांच्या मागण्याही वाढत गेल्या आहेत. त्या पाटण नगरपंचायतीच्या माध्यमातुन पुर्ण होत आहेत. येत्या एक वर्षात प्रत्येक प्रभागात रस्ता, गटर व पीण्याच्या पाण्याच्या योजना अशी विविध  विकास कामे होणार आहे ही कामे करत असताना त्या त्या प्रभाग मधील नागरीकानी चांगल्या दर्जाची कामे ठेकेदारा कडुन करुन घ्या आणि हे काम होत असताना कोणी तरी येवुन विरोधाला विरोध म्हणुन काम अडवत असेल तर त्यांचा डाव हणुन पाडावा. पाटण शहरात आज पर्यंत आपण सर्वानी एकत्र येवुन पाटण शहराचा विकास केला आहे या पुढे ही पाटण शहरात मतभेद बाजुला ठेवुन पाटण शहराचा चेहरा मोहरा बदलण्या साठी एक संघ रहा असे अवाहन सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.
या कार्यक्रमास विक्रांत  काबंळे, शंकर मोहिते, बाबासो सुतार, वामनराव भिसे, चितांमणि सुतार, शंकर कदम, मनोज वाघमारे,‌ युवराज जाधव, सागर भिसे, पप्पु घाडगे, राजेद्र सुतार, अरुण लोहार, अजित महाडीक, आनंदा सोनावणे, दौलत आर्डे, सुरज आर्डे, आनंदा चव्हाण, उत्तमराव भिसे, ए.के पाटील, शिरीष देशमुख,संतोष शिल्पी, गणेश सुतार आदींसह मोठ्या संख्येने पाटण शहरातील नागरिक उपस्थित होते.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular