Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीस्वातंत्र्यवीर सावरकर हे सिध्द मंत्र होतेः भार्गवराव सरपोतदार

स्वातंत्र्यवीर सावरकर हे सिध्द मंत्र होतेः भार्गवराव सरपोतदार

साताराः स्वा. वि.दा.सावरकरांचे व्यक्तीमत्व तेजस्वी होते. सावरकर निस्सीम देशभक्त होते. सावरकर म्हणजे दाहकापरि संजीवक होते. सावरकर सत्य इतिहासाचे संशोधक होते, महान भाषाकार होते, थोर समाजसुधारक होते. अंधश्रध्दा निर्मुलनाचे प्रणेते होते. त्यांच्या राष्ट्रभक्तीची विचारांची भावी पिढीस गरज आहे, सावरकरांच्या महान कार्यातून, विचारांतून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांनी त्यांचे जीवन राष्ट्रास अर्पिले होते ते एक महान सिध्दपुरूष होते. असे प्रतिपादन विश्‍वहिंदु परिषदेचे क्षेत्रीयमंत्री भार्गवराव सरपोतदार यांनी केले.
स्वा.वि.दा.सावरकर विचार संस्था सातारा व श्री.छ.थोरले प्रतापसिंह महाराज नगरवाचनालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सरपोतदार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डॉ.श्याम बडवे होते. विचार संस्थेचे अध्यक्ष भाऊराव स्वामी, कार्याध्यक्ष बाबूजी नाटेकर, विश्‍वस्त मोहन साठे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख वक्ते भार्गवराव सरपोतदार यांच्या हस्ते नगरवाचनालयात पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन व सावरकरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तदनंतर विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीयमंत्री कै.आबदेवसर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
संस्थेचे विश्‍वस्त मोहन साठे यांनी प्रास्ताविकात सावरकरांच्या व्यक्तीमत्वाचा व कार्याचा आढावा घेतला. संस्थेचे कार्याध्यक्ष परिचय करून दिला. नगरवाचनालयाच्या कार्यवाह सौ.ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी वाचनालयाच्या उपक्रमाविषयी माहिती सांगितली.
भाऊराव स्वामी यांनी मनोगतामध्ये सांगितले की, सावरकरांच्या कार्याच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने जलतरण तलाव व्हावा. या महान कार्यास सर्व देशभक्तांनी सातारा शहरात व्हावे या महान कार्यास सर्व देशभक्तांनी सहकार्य करावे. सावरकरांच्या विचारांचा वारसा अखंड पुढे सुरू रहावा.
नगरवाचनालयाचे कार्यवाह श्याम बडवे यांनी अध्यक्षीय भाषणात सावरकरांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे गुण सांगितले. सावरकरांनी मराठी भाषेला दिलेल्या मराठी शब्द संपत्तीचा परिचय करून दिला. नगरवाचनालयाच्या कार्याची व भावी योजनांचीही त्यांनी माहिती दिली.सदर कार्याक्रमाप्रसंगी अशोक वाळिंबे, वसंत लखापती, लक्ष्मणराव भंडारे, सोमनाथ जाधव, तसेच सावरकरप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहन साठे यांनी केले. श्याम बडवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular