साताराः शाहुनगर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सातारा येथील श्रीनिधी एज्युकेशन संस्थेेचे संस्थापक चेअरमन अमित कुलकर्णी यांचा सत्कार गुरूकुलचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रसिध्द व्याख्याते नितीन बानुगडे – पाटील, आनंद गुरव , मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, माध्यमिक विभागाच्या इनचार्ज सौ. सोनाली तांबोळी, पुर्व प्राथमिक विभागाच्या इनचार्ज सौ. अनुराधा कदम उपस्थित होते.
नुकतीच शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून अमित कुलकर्णी यांना नामनिर्देशित म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल मा.विदयासागर राव यांनी नियुक्ती केली आहे. यावेळी बोलताना राजेंद्र चोरगे म्हणाले की, अमित कुलकर्णी यांची शिवाजी विदयापीठ व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती ही त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कामाची पोहच पावती आहे.
सत्कारास उत्तर देताना अमित कुलकर्णी म्हणाले की, गुरूकुल ने केलेला सत्कार हा माझ्यासाठी महत्वाचा असून आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत कार्यरत राहिल्यास अनेक संधी उपलब्ध होतात.
यावेळी, श्रमधुकर जाधव ,अॅड. राजेंद्र बहुलेकर, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अमित कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.दरम्यान अमित कुलकर्णी यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस अनेकांनी समक्ष भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत.
याबरोबरच युवक युवतींचे विद्यापीठ स्तरावरील प्रश्न जातीने सोडवणार असल्याचे आपल्या सत्काराला उत्तर देताना अमित कुलकर्णी यांनी स्पष्टकेले. शिवाजी विद्यापीठाच्या प्रतिनिधीपदी निवड झाल्यानंतर सातारा शहरात खासकरून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्यांनी त्यांचे समक्ष भेटून पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले आहे.
शिवाजी विद्यापीठ कौन्सिलवर निवड झाल्याबद्दल गुरूकुलच्या वतीने अमित कुलकर्णीचा सत्कार
RELATED ARTICLES