Saturday, June 21, 2025
HomeUncategorizedजेष्ठ नागरिक संघाच्या मार्फत तिळगुळ वाटप संपन्न

जेष्ठ नागरिक संघाच्या मार्फत तिळगुळ वाटप संपन्न

म्हासुर्णे (तूषार माने प्रतिनिधी):- म्हासुर्णे ता.खटाव येथील जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने म्हासुर्णे येथील सरस्वती वाचनालय येथे संपन्न झाला.यावेळी तिळगुळ वाटप करण्यात आले सर्व जेष्ठ नागरिकांनी एकत्र येवुन भेट घेवुन एकमेकांना तिळगुळ देवुन भेट घेतली.त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सचिन माने व कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिचंद्र माने व भैरवनाथ बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक मोतीराम माने,शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने,व्हि.एल.सर,बी.एन.इनामदार,जयश्री इनामदार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलताना म्हणाले की,जेष्ठ नागरिक संघाची बरेच दिवसाची मागणी लक्षात घेता जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने विरंगुळा केंद्राची मागणी करण्यात आली आहे ती मागणी आपण जागा उपलब्ध करुन मागणी पुर्ण करु असे यावेळी बोलताना आश्वासन दिले.यावेळी सर्व जेष्ठ नागरिक एकत्र आले होते.जेष्ठ नागरिकांच्या सहली विषयक चर्चा यावेळी झाली व जेष्ठ नागरिक संघामध्ये काही नविन संचालकांच्या निवडी करण्यात आल्या.यावेळी आर जी.कुलकर्णी,तुळशिराम माने,भिमराव माने,शंकर माने,विलास माने,रघुनाथ माने,ए.आर.दबडे सर,सदाशिव माने,लहु पाटील,विजय गुरव,अशोक माने,शिवाजी माने,मनोज जंगम व जेष्ठ नागरिक व ग्रामंस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्तविक बी.एन.इनामदार यांनी केले.आभार जयश्री इनामदार मँडम यांनी मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular