शालेय पोषण आहार कर्मचार्‍यांच्या वरील गुन्हे मागे घेतले नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

साताराः शालेय पोषण आहार योजनेतील स्वयंपाकी,मदतनीस यांचे मानधन 10,000/-रु.(दहा हजार रुपये)करावे, अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार स्वयंपाकी,मदतनीस कर्मचारी फेडरेशन तर्फे रविवार दि. 31 मार्च 2019 विद्याभवन,सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ येथे निर्धार मेळावा घेण्यात आला.
मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना 2002 पासून मिळतो.अन्न शिजविण्याच्या कामासाठी स्वयंपाकी व मदतनीस नेमण्यात आले. प्रचंड महागाईच्या काळात फक्त रु.500 ची वाढ करुन शासनाकडून गरीब,कष्टकरी समाजाची चेष्टा करण्यात आली आहे.नजिकच्या काळात त्याची मोठी किंमत सरकारला मोजावी लागेल,यावेळी किमान वेतनदहा हजार रुपये द्यावे,ही आमची प्रमुख मागणी आहे.आंध्रप्रदेश धर्तीवर शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी करावी.स्वयंपाकी , मदतनिसांना कुकचा दर्जा मिळावा अशी मागणी मेळाव्यात करणेत आली.
23 डिसेंबर 2018 रोजी सातारा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न करणार्‍या महिलांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत,अन्यथा येणार्‍या लोकसभा निवडणुकीवर सातारा जिल्ह्यातील 7500 कर्मचारी बहिष्कार घालणार असल्याचा इशाराही यावेळी दिला आहे.
मेळाव्यास जिल्ह्यातील स्वयंपाकी,मदतनीस यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शा.पो.आ. स्वयंपाकी,मदतनीस,फेडरेशन अध्यक्ष वैशाली दुबळे,सचिव सुरेखा उंबरे,विद्या यादव,संगिता कवळे,शितल आगाटे,अनुराधा आगाटे,जिजा शेलार,गंगूबाई शिंदे,अंजना देसाई,सुभ्रदा देसाई,संगिता सुतार,पुष्पा पोळ,लता लोंडे,माधवी सोनावले,सारिका शेडगे,जयश्री देशमुख ,भारती पाटील,विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.