Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedशेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानकडून माण-खटावच्या पोलीस ठाण्यात सॅनिटायझर, मास्क,हॅंडग्लोजचे वाटप ; ...

शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानकडून माण-खटावच्या पोलीस ठाण्यात सॅनिटायझर, मास्क,हॅंडग्लोजचे वाटप ; औंध पोलीस ठाण्यातही सर्व पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांना वाटप!

औंध:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या पोलीस बांधवाना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेले सॅनिटायझर, मास्क व हॅंडग्लोजचे वाटप संपूर्ण माण-खटाव तालुक्यातील पोलीस ठाण्यात शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानकडून करण्यात आले.

औंध पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानकडून वाटप करण्यात आले.सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्याकडे सर्व साहित्य सुपूर्द करण्यात आले,यावेळी आलीम मोदी,चंद्रकांत पवार,गणेश चव्हाण,धनाजी आमले,काका घार्गे,सपना रजपूत,जगदंबा पॅनेलचे सर्व सदस्य प्रतिष्टानचे सर्व सभासद यांची प्रमुख उपस्थिती होती.दोन्ही तालुक्यातील पोलीस बांधवाना प्रतिष्ठानच्या वतीने वाटप सुरू असल्याची माहिती गणेश चव्हाण यांनी दिली.यावेळी पोलीस नाईक प्रशांत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular