मायणी (सतीश डोंगरे) : पाचवड तालुका खटाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवाजीराव घाडगे (गुरुजी )यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
अध्यासी अधिकारी तथा मंडलाधिकारी पी. बी.पारवे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक समीर गाढवे तलाठी एस.एन.म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थिती हि निवड पार पडली.
येथील उपसरपंच निवडणूक पार पडली. यावेळी माजी उपसरपंच उद्धव घाडगे यांचा कार्यकाल संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती .त्यावेळी काकासो घाडगे, सुदाम घाडगे,डाँ.विठ्ठल घाडगे,दिलीप कुंभार ,रघुनाथ घाडगे,सचिन कटरे व संजय अवघडे सह ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.