सातारा (एकनाथ थोरात) : शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिवथर शाखा कोडोली कार्यालयात शनिवारी रात्री 10.45 वाजता अचानक सायरन वाजला आणि शाखेच्या ठिकाणी परिसरात रहिवासी नागरिक यांनी धाव घेतली. बंद असलेल्या शाखेच्या कार्यालयातून सायरनचा आवाज मोठ मोठ्याने होत होता. यानंतर या शाखेतील अधिकारी साळुंखे यांना संचालक आबा साबळे यांनी मोबाईलवर संपर्क करुन माहिती दिली.
दरम्यान, शिवशक्ती पतसंस्थेतील सायरन तिजोरी जवळ उंदीर किंवा पालीचा स्पर्श झाल्याने सायरन वाजायला सुरुवात झाली असावी असा तर्क वितर्क रहिवाशी नागरिकांनी व्यक्त केला. पतसंस्थेचे अधिकारी साळुंखे यांना सायरन सुरु असल्याची माहिती आबा साबळे यांनी दिल्यानंतर सुमारे अर्धा तासाने कर्मचारी पतसंस्थेत आल्यावर तपास करण्यात आला. तिजोरीजवळ उंदीराचा स्पर्श झाल्यामुळे सायरन वाजल्याचे लक्षात आले. यानंतर उपस्थित नागरिकांना धीर मिळाला. सुरुवातीस पहिल्यास शिवशक्ती पतसंस्थेच्या कोडोली शाखेत सायरन वाजल्याचे घटना कळताच अनेकांनी पतसंस्थेच्या ठिकाणी धाव घेतली. सायरनचा आवाज रात्रीच्या शांततेत मोठ्याने येत असल्याने अनेकाना कुतुहल निर्माण झाले होते. पतसंस्थेत एमआयडीसी मधील कामगारांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात, सोने तारण कर्ज व्यवहारही कोडोली शाखेत होत असतात. सुरक्षिततेचया दृष्टीने पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रभाकर साबळे यांनी धोरणात्मक निर्णय घेवून प्रत्येक शाखेत सायरन व सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले होते.
शिवशक्ती पतसंस्थेच्या कोडोली शाखेत सायरन वाजला आणि धाकधुक वाढली…!
RELATED ARTICLES