मायणी :- (सतीश डोंगरे) श्रीसंत सद्गुरू मातोश्री सरुताईं देवस्थानला असणाऱ्या ‘क वर्ग दर्जा तुन मिळणाऱ्या निधीतून सध्या देवस्थान परिसरात गोशाळा अन्य सुविधा ची कामे सुरू असून लवकरच मायणी तिरक्षेत्राला ‘ ब’ वर्ग दर्जा मिळवून देणार असल्याचे उद्गार ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी काढले. ते श्री संत मातोश्री सरुताई यांच्या सहाव्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या मुख्य दिवशी असणाऱ्या रथोत्सव च्या पूजना प्रसंगी बोलत होते यावेळी काडसिध्देश्वर महाराज,युवानेते सचिन गुदगे,उपसरपंच सुरज पाटील, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव शेवाळे,विजय कवडे,जगन्नाथ भिसे, प्रदीप शेटे ,संजय गुदगे,जालिंदर माळी,राजाराम कचरे,पांडुरंग लोहार गुरुजी ,ट्रस्टचे सचिव रवींद्र बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बो,लताना डॉ येळगावकर म्हणाले,मायणी ला ब वर्ग दर्जा मिळाल्यास सरुताई देवस्थान,धनगर विठोबा देवस्थान व यशवंतबाब देवस्थान ट्रस्टचा विकास करता येईल. आणि यासाठी मी प्रयत्नशील आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मायणीच्या श्री संत सरुताई माऊली यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित रथ सोहळा भक्तीमय वातावरणात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
आज पहाटे ४ वाजून ३२ मिनीटांनी हजारो भाविकांचे उपस्थितीत मातोश्री सरुताई माऊली यांच्या समाधीवर फुलांचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर ह.भ्.प.विजय महाराज लोणीकर यांचे काल्याचे किर्तन व रिंगण सोहळा संपन्न झाला. दुपारी १२वांजता माजी आ.डॉ. श्री.व सौ. दिलीप येळगांवकर यांचे हस्ते रथ पूजन व महाआरती झाल्यानंतर फुलांनी सजविलेल्या रथातून माऊली सरुताईंच्या प्रतिमेची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. रथापुढे मिरवणूकीत झांज,गजी पथक, हत्ती,घोडे, उंट,भजनी मंडळतसेच पाचशे ताल मृदुंग वादक आदींचा सामावेश होता. ठिकठिकाणी भाविक अत्यंत भावपूर्वक रथावर देणगी अर्पण करीत होते ,महिला ओवाळत होत्या. रात्री उशीरा रथ ग्रामप्रदाक्षिणा करुन मठामध्ये आला.
मठ परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी १२नंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मायणी पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष गोसावी व त्यांचे सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. मातोश्री सरुताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रथसोहळा यशस्वी करण्यासाठी पवनपुत्र अँकेडमी चे श्री जाधव सर,त्यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ट्रस्ट संयोजकांनी ,स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
:- मातोश्री सरुताई यांच्या नावाने असणारे पॅनेल ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी होऊन मायणी ग्रामपंचायतीत परिवर्तन झाले तेंव्हापासून सरपंच सचिन गुदगे,उपसरपंच सुरज पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे ,कारभारामुळे मायणी तीळ जनतेचा पाण्याची टंचाई भासली नाही त्यांना एकही टँकर विकत आणावा लागला नाही. या प्रमाणे डॉ येळगावकर यांनी ग्रामपंचायत कारभाराचे कौतुक केले.
:- कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ,खासदार संजयकाका पाटील यांची श्रीसंत सरुताई यांच्यावरील भक्ती अलोट आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी वेळात वेळ काढून माऊलीच्या रथोत्सवाचे दर्शन घेऊन आपली माऊलींच्या प्रतीची भक्ती प्रकट केली.
: -मातोश्री सरुताई माऊली रथ व पालखी सोहळ्या दरम्यान रांगोळी कला लिम्का
बुक ऑफ रेकॉर्ड करणारी आळंदीची राजश्री जुन्नरकर हिने सोहळ्या दरम्यान रथ
मार्गावर आकर्षक अश्या रांगोळीच्या विविध कलाकृत्या सादर केल्या.