Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीक्षेत्र महाबळेश्वर येथील श्री शिवगंगा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत केली...

क्षेत्र महाबळेश्वर येथील श्री शिवगंगा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत केली वृद्धेला आर्थिक मदत

महाबळेश्वर दि १७-  प्रतिनिधी . :-  क्षेत्र महाबळेश्वर येथील श्री
शिवगंगा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत गावातील
वृद्ध सावित्रीबाई रामचंद्र कांबळे यांना १०,००० रुपयांची आर्थिक मदत
केली कांबळे यांचे हृदयाचे ऑपरेशन सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये
मध्ये झाले त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचा
औषधोपचाराचा खर्चाचा भार हलका व्हावा तसेच गावातील ग्रामस्थांच्या कठीण
काळात तसेच गरजेच्या वेळी मदत व्हावी या उद्देशाने श्री शिवगंगा
बहुउद्देशिय सामाजिक संस्थाच्या वतीने ही मदत करण्यात आली संस्था नेहमीच
अश्या सामाजिक कार्यात सढळहस्ते मदत करत असते सावित्रीबाई कांबळे
यांच्याकडे मदत सुपूर्त करताना संस्थेचे अध्यक्ष सयाजी गोपाळ
लांगी,उपाध्यक्ष प्रशांत अवकिरकर,सचिव मनोहर शेडगे,खजिनदार अनिल बिरामणे
व सदस्य धनेश  वाडेकर,सरपंच सुनिल बिरामणे,प्रदीप कात्रट,पंढरीनाथ
लांगी,अनिल जाधव,रविंद्र धनावडे,राजेंद्र पुजारी,रमेश पवार,आनंद
कदम,विश्वनाथ रांजणे,दत्तात्रय कांबळे,प्रशांत कात्रट,जितेंद्र जाधव,
संजय मोरे, दिनेश झाडे,राहुल कदम,सुधीर शेडगे या सर्वांच्या उपस्थितीत
सौ.सावित्रीबाई कांबळे यांना हा चेक प्रदान करण्यात आला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular