उंडाळे : सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना प्रति क्विंटल 3050 रूपये हमी भाव देणार्या शासनाच्या खरेदी केंद्रावर शासनाने खरेदी सुरू करून महिना उलटला तरी अत्यल्प खरेदी झाल्याने शासनाच्या हमी भाव योजनेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे. अनेक जाचक अटी लावल्याने इच्छा असुनही शेतकरी खरेदी कें्रद्रा ऐवजी व्यापार्यांना कमी किंमतीत विक्री करून तोटा सहन करत आहेत.
शेतकर्यांना उत्पादित मालाला हमी भाव मिळावा यासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यात हमी भाव खरेदी केंदे्र सुरू केली असली तरी या केंद्रावर शेतकरी मात्र सोयाबीन विक्री करण्यासाठी आले असता शेतकर्यांना शासनाच्या नियम अटी सांगताच या शेतकर्यांची झोपच उडुन जाते या मध्ये सर्व प्रथम शेतकर्यांने खरेदी केंद्रावर बाजार समिती स्तरावर माल विक्री पुर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्या नोंदणीसाठी 7/12 आधार कार्ड , बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स देऊन पुन्हा माल केंद्रावर नेणेचा आहे.
यानंतर पुन्हा सरकारने अनेक जाचक अटी लावल्या असुन सरकारने निश्चित केलेल्या एएक्यु प्रतिचा माल आणावा माल आणताना चाळणी मारून स्वच्छ ओलावा 12 एवढा असावा आणि हे सर्व केल्यानंतर संबंधीत शेतकर्यांला माल केव्हा खरेदी केंद्रावर आणायचा हे केंद्राकडुन सांगितले जाणार आहे.
तोपर्यंत शेतकर्यांची भुमिका असते कारण वाळवणे आणि स्वच्छतेसाठी शेतकर्यांच्या जवळ वेळ नाही त्यातच पाऊस व शेतीची इतर कामे मजुर तुटवडा हे प्रश्न असतात त्यामुळे सरकारच्या खरेदी केंद्रावर माल आणुन ही उठाठेंव शेतकर्यांनी दर व गरज असुनही पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
खरे तर शेतकर्यांचा माल हा सरकारने जसा उत्पादीत झाला तसा प्रत पाहुन कमी अधिक दराने खरेदी करून शेतकर्यांना दिलासा देण्याची गरज असताना नियम व अटींच्या ओझ्याखाली दाबुन अप्रत्यक्ष व्यापार्यांना पांठिबा दिल्याचेच शेतकर्यांमधुन बोलले जात आहे.