मेढा( प्रतिनिधी)-दिवंगत यशवंतराव चव्हाण कण्हेर बीटाच्या बीटस्तरीय बालक्रिडा स्पर्धा प्राथमिक केंद्रशाळा पेट्री बंगला ता.सातारा या ठिकाणी उत्साहात संपन्न झाल्या.स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करून मशाल प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले.
उदघाटनप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सौ.जयश्री शिंगाडे,केंद्रप्रमुख संजय सातपुते,सुरेश भुरकुंडे,सरपंच अमोल जाधव,लक्ष्मण गोगावले, सदस्य गणेश माने,क्रीडा तालुका समन्वयक वैभव चिखले,क्रीडा केंद्रसंचालक,पेटेश्वरनगर आदर्श माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत साखरे तसेच कोंडवे,कामथी,पेट्री,अंबवडे प्राथमिक केंद्रशाळेचे मुख्याध्यापक,सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,विदयार्थी मोठयासंख्येने उपस्थित होते.दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी सौ.जयश्री शिंगाडे यांनी सर्व विदयाथ्र्यांना स्पर्धेविषयी माहिती देऊन तालुकास्तरावर सहभागी विद्यार्थी व शाळांना शुभेच्छा दिल्या.
या बीटस्तरीय बालक्रिडा स्पर्धेत धावणे,रिले, रस्सीखेच,गोळाफेक,थाळीफेक,लांब उडी,लंगडी,खो खो, कबड्डी आदी लहान गट व मोठया गटाच्या वैयक्तिक व सांघिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.बीटातील सर्व शाळांच्या विद्याथ्र्यांनी उत्कृष्ट खेळ करत प्राविण्य मिळवले.या स्पर्धेत कोंडवे,पेट्री,कामथी,अंबवडे आदी केंद्रातील शाळांचे विदयार्थी सहभागी झाले होते.विजयी स्पर्धकांची तालुकास्तरावर निवड झाल्याने सर्व स्तरातुन त्यांचे कौतुक होत आहे.
बालक्रिडा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होऊन सर्व यशस्वी विदयार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ,शिक्षण विस्तार अधिकारी सौ.जयश्री शिंगाडे,केंद्रप्रमुख संजय सातपुते,सुरेश भुरकुंडे यांनी अभिनंदन केले. या स्पर्धांना पालक,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
दरवर्षी संपन्न होणाऱ्या या बालक्रीडा स्पर्धांतुन विदयार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असुन या स्पर्धेमुळे विद्यार्थी यांना नेतृत्व,संयम,सहकार्य,सहानुभुती आदी विविध गुणांचा विकास होण्यास मदत होत आहे.
सौ.जयश्री शिंगाडे,
शिक्षण विस्तार अधिकारी,बीट-कण्हेर