उदयपूर : उदयपूर येथील 26 वर्षांची जलतरणपटू भक्ती शर्मा 5 महासागर आणि 7 समुद्रात यशस्वी जलतरण करणारी जगातील सर्वात कमी वयाची जलतरणपटू आहे. 2020 ला टोकयो येथे होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे तिचे ध्येय असून त्यासाठी तिची कसून तयारी सुरू आहे. ऑलिम्पिकच्या ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धेत तिला सहभागी व्हायचे आहे. विशेष म्हणजे भक्तीला सहकार्य करण्याचे आवाहन नामवंत संगीतकार ए. आर. रहमान यानेही केले आहे. 22 जुनला रहमान याने ट्विटवर भक्तीला सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर भक्ती एकदम चर्चेत आली आहे.
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी भक्तीला विविध स्पर्धांत सहभागी व्हावे लागणार आहे. ऑलिम्पिकसाठी पूर्वी होणार्या दोन जागतिक स्पर्धात सहभागी होणे आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या दहामध्ये सहभागी झाल्याशिवाय ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकत नाही. सध्या ती याच ध्येयाने कसून सराव करत आहे. प्रशिक्षणासाठी भक्तीला 2.30 लाख रुपयांची गरज असून त्यासाठी तिने मदतची आवाहन केले आहे. फ्युएल द ड्रीम या क्राउड फंडिंगचीही तिने मदत घेतली आहे. भक्तीला आतापर्यंत 1.18 लाख रुपयांची मदत मिळालेली आहे.
2015 ला अंट्राक्टिक येथील सागरात 1 डिग्री इतक्या कमी तापमानात 2.28 किलोमीटर इतके अंतर 41.14 मिनिटांत पूर्ण केले होते. हा जागतिक रेकार्ड तिच्या नावावर आहे.