सोशल मीडियावर लोकप्रतिनिधींवर टिका करणारांची संख्या गोठली       

सातारा दि :जगभरात कोरोना संसर्ग गडद झाला असून भारत देशात गावपातळी पासून ते संसदेपर्यंत कोरोना पोहचला आहे. या वर मात करण्यासाठी  देशभरातील संस्था व काही लोकप्रतिनिधी पुढे सरसावले आहेत. ही सुखद बाब पाच महिन्यानंतर पहाण्यास मिळत असल्याने सोशल मीडियावर मंत्री, खासदार, आमदार सारख्या लोकप्रतिनिघी विरोधी एकतर्फी टिका व्हायरल करणारे ‘अर्धवट राव ‘यांची संख्या झपाटयाने गोठत आहे. असे सध्यातरी विविध ग्रुपवरील पोष्टने दिसून आले  आहे.                                                जगभरात कोरोना संकटाने आज रोजी नऊ लाख तीस हजार तर भारत देशात ऐंशी हजार व महाराष्ट्रात देशाच्या मृत्यू दरा पेक्षा चाळीस टक्के म्हणजे तीस हजार लोकांचे साडेपाच महिन्यात बळी गेले आहेत. सर्व प्रकारच्या खबरदारीच्या उपाय योजना भारतात केंद्र व राज्य सरकार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती,जिल्हा, तालुका व शहर प्रशासनामार्फत राबविण्यात आल्या. परंतु, लॉक डाउन निर्णय,अन्न व धान्य , इंधन पुरवठा,  कायदा व सुव्यवस्था बैठका व ई-पास अशा कामातून प्रत्यक्ष गाव पातळीवर जिल्हा प्रशासन पोहचू शकले नाही. त्यामानाने स्थानिक पातळीवर प्रसार माध्यमे, पोलीस, आरोग्य विभाग, शिक्षक, अंगणवाडी, आशा सेविका व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व संघटना, पक्ष कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर कोरोना संकट रोखण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले. अपुऱ्या साधनसामुग्री मध्ये अक्षरशा बिहार येथील गरीब मजुदर माऊंटन मॅन दशरथ मांजी याने गहलोर(गया)   याच्या सारखे स्वतः जबाबदारी घेऊन जनजागृती व मदतीचा रस्ता तयार केला.परंतु, मोठ्या संख्येने शहरातून गावी लोकांनी स्थलांतरित होण्याचा त्या वेळी निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणून खेड्यापाड्यात कोरोनाच्या शिरकाव झाला. हे आता जगजाहीर झाले आहे.                                           जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना संकटावर वेळीवेळी औषध उपचार किती प्रकारचे केले? जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुठे व किती लोकांना करण्यात आला? त्याची माहिती देण्यापेक्षा सरकारी प्रसार माध्यमांनी कोरोना बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण व  बधितांचे मृत्यू आणि प्रतिबंधित क्षेत्रातील आदेश याचीच जास्त माहिती दिली.खरं म्हणजे अशा वेळी कोणत्या ठिकाणी उपचार मिळू शकतो?सध्याची औषध व ऑक्सिजन ची काय परिस्थिती आहे? किती डॉक्टर, कर्मचारी व रुग्णवाहिका उपलब्ध आहेत? याची माहिती आवश्यक असूनही ती देण्याचा प्रयत्न सुरू केला नाही. असा आरोप सर्वसामान्य करीत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण दगाविले की नातेवाईक व  स्थानिक रुग्णालय प्रशासक यांच्यातील संघर्ष उभा राहिला आहे. असा दावा रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते प्रतीक गायकवाड, शिवसेनेचे रमेश बोराटे, भाजप युवा मोर्चाचे रमेश उबाळे व कोरोना रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. त्यांना आता काही घटनेत स्थानिक लोकप्रतिनिधी याची साथ लाभत आहे.                                                  महत्वाचे म्हणजे काही लोकप्रतिनिधी व उधोजक, शैक्षणिक संस्था चालक, सामाजिक कार्यकर्ते यांनी कोरोना संकटात मानवतेचे दर्शन घडवून जीवनावश्यक वस्तू, सैनिटायझर, मास्क सोबतच स्वतःचे घर-बंगले, फार्म हाऊस,मंगल कार्यालय,खाजगी इमारती कोरोना रुग्ण सेवेसाठी दिले आहेत. जे अर्धवट राव माहिती न घेता पक्ष व व्यक्तिगत द्वेषाने या पूर्वी  सोशल मीडियावर टिका करीत होते. ते आता अशा लोकप्रतिनिधींवर स्तुतीसुमने उधळू लागले आहेत. सोशल मीडियावर काहीं टिका करणाऱ्यांनी स्वखर्चाने माणुसकी जपण्याचे काम  सुरू केले आहे.हा बदल कोरोना संकट वाढल्याने घडू लागला आहे                               शहरी व ग्रामीण भागात मोबाईलला दोन जे बी नेट मिळत असल्याने काही तत्वज्ञानी ऐपत असतानाही मोहल्ला, गली व गावात आर्थिक मदत न करता फक्त टीकेचे दळण दळण्याचे काम करीत आहेत. त्यांना कृतीतून मदत करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे असे आता प्रसार माध्यमे सुध्दा मानू लागले आहे.  ठराविक लोकप्रतिनिधी विकास कामांसोबतच जनतेच्या मदतीसाठी धावू लागल्याने आताच्या स्थितीत गाव पातळीवर युवा वर्ग वर्गणी गोळा करून ऑक्सिजन यंत्र खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन,आरोग्य,पोलीस दलाही सहकार्य लाभले आहे. असे चित्र दिसत आहे.यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे मत लोकप्रतिनिधी चे समर्थक व्यक्त करू लागले आहेत.