धोममधल्या खूनप्रकरणाला पोलिसच जबाबदार : तृप्ती देसाई
सातारा : वाई हत्त्याकांडातील पिडीत कुटुंबियांची खा. उदयनराजे भोसले व भुमाता ब्रिगेडची अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आज भेट घेतली. यावेळी तृप्ती देसाई यांनी संतोष पोळ प्रकरणास पोलीसच खरे जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत येत्या 25 ऑगस्ट रोजी वाई येथे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. दहा दिवसापूर्वी तथाकथित डॉ. संतोष पोळ याला मंगला जेधे याच्या खून प्रकरणात अटक केली असता तपासात त्याने तब्बल सहा खून केल्याचे उघडकीस आले. संपुर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाने खळबळ माजवली होती. या घटनेचा संपुर्ण महाराष्ट्राने निषेध व्यक्त करून तथाकथित डॉ. संतोष पोळ याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वाढत चालली आहे. आज या हत्त्याकांडातील बळी पडलेल्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी खा. उदयनराजे व तृप्ती देसाई यांनी वाई येथे भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी उदयनराजे यांनी तपासाबाबत माहिती घेतली. अशा गुन्हेगाराला गोळ्या घातल्या पाहिजेत अशी मागणी केली. तसेच आखाती देशात बलात्कार करणार्यांना भर चौकात गोळ्या घातल्या जातात. असाच कायदा भारतातही अंमलात आला पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच तृप्ती देसाई संतोष पोळच्या कृत्याला पोलीस प्रशासनाची दिरंगाईच जबाबदार असून सर्व पोलीस अधिकार्यांची चौकशी झाली पाहिजे, तसेच महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्र्याची मागणी केली. यावेळी येत्या 25 ऑगस्ट रोजी वाई येथे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
चौकट
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी संतोष पोळ याच्या पत्नीला चौकशीसाठी बोलविले होते. यावेळी चौकशी दरम्यान संतोष पोळच्या पत्नीने या घटनेमुळे आम्ही पुर्ण कुटुंब धक्क्यात असून माझे पती असे काही करत असतील याच्यावर आम्हाला अजुनही विश्वास बसत नसल्याचे पोलीसांना सांगितले.
2003 असलेल्या वाई येथील पोलीस अधिकार्याने पहिल्या मिसींगमध्ये योग्य तो तपास केला असता, तर संतोष पोळ या क्रुरकर्म्याकडून होणारे पुढील गुन्हे झाले नसते. यामुळे त्या अधिकार्याची चौकशीची मागणी यावेळी तप्ती देसाई यांनी केले.