Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीउदयनराजेंच्या स्टाइलची सर्वानाच पडली भूरळ

उदयनराजेंच्या स्टाइलची सर्वानाच पडली भूरळ

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभेचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची स्टाइल महाराष्ट्रात सध्या धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची स्टाइल घरोघरी पोहचले आहे. त्यांची कॉलर उडवण्याची स्टाइल आज त्यांच्या प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू बनली आहे. खासदार शरद पवार यांच्यापासून ते 5 वर्षाच्या लहान मुलांपर्यंत ही स्टाइल पोहचलेली आहे .ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुण मुलांपर्यंत युवतींपासून ते ग्रहांपर्यंत सर्वत्र या स्टाइलची खुमासदार चर्चा रंगताना दिसून येत आहे .
सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खा. श्री. छ.उदयनराजे भोसले यांनी केंद्र व राज्य सरकारच्या नामुष्कीकारक पाच वर्षांच्या कामगिरीवर तोफ डागली आहे. त्यांचे वस्त्रहरण केले आहे .त्यांच्या स्टाइलमुळे केंद्र शासनाचे अपयश हे तरुणांच्या मनात खदखदू लागले आहे. इंटरनेटवर सर्वाधिक जास्त सर्च खा. श्री. छ. भोसले यांच्या नावाला केलेले पहावयास मिळत आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्या कमालीची वाढत चालली आहे. आता खासदार भोसले यांच्या इंटरनेट अकाऊंटवर जाहिरात करण्यासाठी काही कंपन्या आतूर झालेले आहेत. सध्या सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात श्री. छ. भोसले यांच्या स्टाईलचे अनुकरणही केले जात आहे .अशावेळी काही सुशिक्षित पालक आपल्या मुलांना खा. श्री. छ.उदयनराजे भोसले हे अभियंता असून इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व कमालीचे आहे . त्यांच्या स्टाइल ची केवळ कॉपी करू नका तर त्यांनी घेतलेले शिक्षण, ज्ञान ,परिश्रम ,संघर्ष यांचीही जाणीव ठेवून अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. असा सल्ला आपल्या पाल्यांना देताना दिसत आहेत .
मोदी जॅकेट स्टाइल वर भारी पडत सातार्‍यात उदयनराजे कॉलर शर्ट लवकरच दाखल होते की काय ?असे वातावरण दिसू लागली आहे . सध्या लहान मुले कॉलरचा शर्ट घालण्याचा हट्ट धरू लागले आहेत. आरसा समोर उभी राहून शर्टची कॉलर उडवुन अगर एक बार मैंने कमिटमेंट की तो, मैं अपने आप की भी नही सुनता,,, असे बोबड्या स्वरात बोलत आहेत. हा डायलॉग सलमान खानचा आहे हे विसरून हा डायलॉगचा पूर्णपणे ताबा उदयनराजेंनी घेतला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. सातार्‍यात दबंग चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते सलमान खान व उदयनराजे भोसले यांची भेट झाली होती. तसेच अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचीही ही भेट घेतली होती. त्यांचेही डॉयलॉग सध्या सभेतून दिसत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular