महाबळेश्वर : महाबळेश्वर मध्ये आठवडे बाजाराचे औचित्य साधून आजूबाजूच्या परिसरातुन आलेल्या नागरिकांनी आज बाजार पेठेमध्ये तोबा गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग चा पुरता फज्जा उडाला होता. परंतु पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवीत वेळीच केलेल्या कारवाईमुळे नाहक गर्दी पांगवण्यास यश मिळवले.
त्याचप्रमाणे नाहक भ्रमंती करणाऱ्या दुचाकी स्वारांवरती देखील गुन्हे नोंद करण्याचे काम सुरू आहे
वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या शहर व आजूबाजूच्या परिसरावरती ड्रोन कॅमेरा मार्फत लक्ष ठेवले जात आहे. परंतु नागरिक याचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने भविष्य काळात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
महाबळेश्वर मध्ये स्थानिक नागरिकांची अनावश्यक गर्दी
RELATED ARTICLES