(अजित जगताप )
वडूज दि: नव्याने स्थापन झालेल्या खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतीमध्ये भाजप बहुमतात आहे. त्यामुळे यंदा नगराध्यक्ष पदासाठी प्रभाग क्रमांक आठ मधील नगरसेवक सोमनाथ जाधव व महिला नगरसेविका सौ स्वप्नाली गोडसे यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे.
खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरपंचायतीचे अडीच वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणाऱ्या काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अडीच वर्षांपूर्वी महिलेसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्षपदी सौ मनीषा काळे यांची वर्णी लागली. त्यानंतर राजकीय अनेक डावपेच आखण्यात आले. परंतु, भाजपने राष्ट्रवादीवर डावपेच उलटून लावले. आता सध्या भाजप पूर्णपणे बहुमत असून आरक्षण लागले तर सोमनाथ जाधव व सौ स्वप्नाली गोडसे यांचे नगराध्यक्षपदी नाव पुढे आलेले आहे.अनुसूचित अनुसूचित जातीसाठी जर आरक्षित झाली तर भाजपकडे ओमकार चव्हाण हे एकमेव नगरसेवक आहेत.
सध्या भाजप पूर्ण सत्तेमध्ये असून केंद्र व राज्यात तसेच माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे आहेत. त्यामुळे विकास कामांमध्ये चालना मिळेल. अशी माहिती ज्येष्ठ भाजप नेत्यांनी दिली आहे. मंगळवार दिनांक ३० जुलै रोजी वडूज नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची सोडत होणार आहे. याकडे संपूर्ण खटाव तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
——————————————
नगरसेवक सोमनाथ जाधव व नगरसेविका सौ. स्वप्नाली गोडसे
वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा आज मंगळवारी होणार फैसला
RELATED ARTICLES