Saturday, June 21, 2025
HomeUncategorizedवेळू व न्हावी बुद्रुक गावात काल पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने दोन्ही गावे पूर्णतः...

वेळू व न्हावी बुद्रुक गावात काल पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने दोन्ही गावे पूर्णतः लाॅक ; वेळू व न्हावी बुद्रुक प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर ; १ कि.मी.चा परिसर सील

रहिमतपूर, दि.२० (प्रतिनिधी) वेळू (ता. कोरेगाव) गावाचा एक ४६ वर्षीय रहिवासी आपली पत्नी, मुलगा मुलगी अशा कुटुंबासह ठाणे येथे राहत होता. ठाण्यात रंगकाम करणे हा त्यांचा व्यवसाय होता. तो आपल्या कुटुंबासह गावात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांना गावातील प्राथमिक शाळेत विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. संबंधित पुरुषाला खोकला येऊ लागल्याने दि.१७ रोजी त्याचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठविण्यात आले. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आलेल्या रिपोर्टमध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले. विलगीकरण कक्षात त्याच्या बरोबर असलेल्या त्याच्या कुटुंबाचीही तपासणी लगेच केली जाणार आहे.
दरम्यान, न्हावी बुद्रुक येथे दि.१६ रोजी वाशी नवी मुंबई येथून ५० वर्षीय वयाचा पुरुष गावी आला. खबरदारी म्हणून त्याला प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्याला ताप आल्याने दि.१८ रोजी त्याचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला. मंगळवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले. गावातील विलगीकरण कक्षात असताना त्यांना त्यांचे वडील व भाऊ डबा घेवून जात होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचीही तपासणी केली जाणार आहे. दरम्यान या गावात पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
**–**

*वेळू व न्हावी बुद्रुक प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर १ कि.मी.चा परिसर सील*
दरम्यान,वेळू व न्हावी बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील रहिवासी असणारे कोरोना व्हायरस (कोविड-१९) संक्रमीत रुग्ण आढळल्याने त्यांना तात्काळ क्रांतीसिंह नाना पाटील, जिल्हा रुग्णालय सातारा येथे आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोना विषाणू च्या प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एक संक्रमीत रुग्णांकडून अन्य व्यक्तीस संपर्कात आल्याने होतो. वेळू व न्हावी बुद्रुक येथील रुग्ण वास्तव्यास असणाऱ्या विलगीकरण सेंटर पाँईट केंद्रस्थानी धरुन १ कि.मी. चा परिसर वेळू व व न्हावी बुद्रक (त्यामध्ये येणाऱ्या १ किमी परिसरातील वाड्या वस्त्या धरुन) प्रतिबंधित क्षेत्र म्हणून उपविभागीय दंडाधिकारी कीर्ति नलावडे यांनी सदरचे आदेश दिले आहेत.
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून रहिमतपूर पोलीस स्टेशन ने वेळू व न्हावी बुद्रुक व रहिमतपूर सह परिसरातील हद्दी प्रतिबंधित केल्या आहेत. त्यानुसार कोरोना बाधीत क्षेत्रातील हद्दीमध्ये वैद्यकीय/ आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तुंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरिता, या सेवा वगळता/ पुरवठा वगळता अन्य व्यक्ती यांना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. दरम्यान, वेळू व न्हावी बुद्रुक (ता.कोरेगांव) गावच्या हद्दीतील दुकानदरांना अत्यावश्यक माल घरपोच करणेकामी आदेशात म्हटले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular