सातारा : सातारा शहर शिवसेनेतर्फे शहर प्रमुख निमिश शहा व महिला संघटक सौ. मिनल शहा यांच्या प्रयत्नातून दि. 27 रोजी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
या दिवशी शहरामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये बेगरहोम सदरबझार येथे चादर व मीष्टांन्न वाटप, आशा किरण शाळा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्टेशनरी आणि नर्सरीच्या मुलांना तीन चाकी सायकल व खेळणी वाटप, मातोश्री वृध्द आश्राम महागांव येथे वृध्दांना छत्री, फळे व बिस्किट वाटप, शाहू बोडींग येथील विद्यार्थ्यांना वह्या, फळे व बिस्कीट वाटप होणार आहे. या कार्यक्रमास कृष्णा खोरे उपाध्यक्ष नितीन बानुगुडे पाटील, एकनाथराव ओंबळे सपर्क प्रमुख सातारा विधानसभा, जिल्हाप्रमुख यशवंतराव घाडगेे, उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, तालुका प्रमुख अतिश ननावरे, अनिल गुजर, आण्णा देशपांडे, कर्नल सुशिल साबळे, शिवाजी पवार, अॅड. शिरीषकुमार दिवाकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन
RELATED ARTICLES